Sonalee Kulkarni: अप्सरेची देशभक्ती, सोनाली कुटुंबियांसोबत पोहोचली भारत-पाकिस्तान सीमेवर

साम टिव्ही ब्युरो

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ अशी ओळख असलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अल्पावधीतच अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.

सोनाली सौंदर्य आणि तिच्या नखरेल अदांनी चाहत्यांना कायमच भूरळ पाडत असते.

सोशल मीडियावर सोनालीच्या वेगवेगळ्या लुक्सची चर्चा होत असते.

नुकतीच सोनाली तिच्या परिवारांसोबत फिरायला गेली आहे.

सोनालीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांना देखील सोनालीच्या विषयी जाणून घ्यायला आवडते.

सोनाली वाघा बॉर्डर अंतर येथे गेली आहे. तिकडचे फोटो तिने शेअर केले आहेत.

‘कित्येक वर्षांची इच्छा आज पूर्ण झाली’ अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

वाघा बॉर्डर ही भारत पाकिस्तान या देशाची सीमा आहे. भारताची शेवटची हद्द मानली जाते

या बॉर्डरवर रोज ‘बीटिंग द रिट्रीट सेरेमनी’हा कार्यक्रम आयोजित केला जातो.या दरम्यान भारत आणि पाकिस्तान देशांचे सैनिक संचलन करतात. हे संचलन पाहण्यासाठी देशभरातून लोक पोहोचले होते.