Chetan Bodke
‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘जय मल्हार’ या दोन्ही मालिकांमुळे अभिनेत्री ईशा केसकर प्रकाशझोतात आली होती.
ईशाच्या 'पती गेले गं काठेवाडी' हे नाटक, 'शेर शिवराज', 'गर्लफ्रेंड' या चित्रपटातल्या ईशाच्या बऱ्याच भूमिका गाजल्या.
सोशल मीडियावर कधी अभिनयामुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
अशातच सध्या ईशा तिच्या आगामी मालिकेमुळे चर्चेत आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर स्टार प्रवाहावरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेमध्ये ती दिसणार असल्याची चर्चा होत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी ‘स्टार प्रवाह परिवार’या सोशल मीडिया पेजवर ईशा केसकरची एक पोस्ट शेअर केली होती.
त्यामध्ये ती स्टार प्रवाहवरील एका मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पण नेमकी ईशा कोणत्या मालिकेत झळकणार आहे? आणि कोणतं पात्र साकारणार आहे? हे गुलदस्त्यात आहे.
सध्या ईशा केसकरच्या आगामी मालिकेची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा होत आहे.