Medical Check up Before Wedding : सावधान ! लग्न करायचे आहे तर 'या' चाचण्या आधी करा, अन्यथा...

कोमल दामुद्रे

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. यादिवसानंतर प्रत्येकाच्या जीवनाची नव्याने सुरुवात होते.

Wedding | Canva

लग्नाची तयारी करताना आपण कपडे, डेकोरेशन, जेवण या सगळ्या गोष्टींची व्यवस्थितरित्या योजना करतो. परंतु, आपल्या जोडीदारांशी लग्न करण्यापूर्वी या चाचण्या करायला हव्या.

Marriage planning | Canva

लग्न करण्यापूर्वी आपल्याला आपल्या जोडीदाराबद्दल काही गोष्टी माहित असणे गरजेचे आहे. याचा फायदा आपल्याला पुढे येणाऱ्या मानसिक तणावासाठी होऊ शकतो.

Marriage Tips | Canva

आपण STD Test करायला हवी. यामध्ये एचआयव्ही, गुप्तरोग, गोनोरिया, नागीण, हिपॅटायटीस बी व सी यांची चाचणी करायला हवी.

Test | Canva

तसेच आपण फर्टिलिटी टेस्टही करायला हवी. ज्यामुळे आपल्या पुढील अडचणींचा वेळीच सामना करण्यास मदत होऊ शकते.

Fertility Test | Canva

आपण रक्ताचे विकार असणाऱ्या चाचण्या अर्थात हिमोफिलिया आणि थॅलेसेमियाची चाचणी करायला हवी. ज्यामुळे त्याचा दूष्परिणाम आपल्या येणाऱ्या पिढीवर होणार नाही.

Blood disease | Canva

काही आजार आपल्याला आनुवंशिक मिळतात त्यासाठी उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, किडनीचे आजार याची चाचणी करायला हवी.

Disease | Canva

रक्त गटातील सुसंगततेची चाचणी आपण करायला हवी ज्यामुळे आपल्याला गरोदरपणाच्या काळात कोणतीही अडचण येणार नाही.

Blood Test | Canva

या सगळ्या चाचण्या आपण लग्न करण्याच्या सहा महिन्यापूर्वी करायला हव्या.

Test Before Marriage | Canva