धनत्रयोदशीला या 7 वस्तू अवश्य खरेदी करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदू धर्माचा मुख्य सण दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने होते. धनत्रयोदशीच्या दिवशी काही नवीन वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते.

Diwali Decoration | Canva

धनत्रयोदशीच्या दिवशी काही खास वस्तू खरेदी करून घरी आणल्याने धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि शुभ परिणाम प्राप्त होतात.

Diwali | Canva

धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी खरेदी करणे शुभ मानले जाते. हे जाणून घेऊया

Diwali 2022 | Canva

झाडू -

झाडूमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी केल्याने घरातील गरिबी आणि आर्थिक संकट दूर होते.

Broom | Canva

धणे -

धनत्रयोदशीच्या दिवशी धणे खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

Coriander | Canva

व्यवसायाशी संबंधित वस्तू -

धनत्रयोदशीच्या दिवशी व्यवसायाशी संबंधित वस्तू खरेदी करा आणि दिवाळीच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी ठेवा.

Business Related Items | Canva

गोमती चक्र -

धनत्रयोदशीच्या दिवशी ११ गोमती चक्रे खरेदी करा आणि दिवाळीच्या दिवशी पूजा केल्यानंतर पिवळ्या कपड्यात बांधा आणि लॉकरमध्ये ठेवा या उपायाने समृद्धी वाढते.

Gomati Chakra | Canva

भांडी -

धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करण्याचीही परंपरा आहे. या दिवशी कोणत्याही धातूची भांडी खरेदी करणे शुभ असते.

Pots | Canva

देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे -

धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे अवश्य खरेदी करा आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावा, असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते.

Laxmis Foot | Canva

दिवा -

दिवाळीच्या दिवशी लावले जाणारे दिवे धनत्रयोदशीच्या दिवशीच विकत घ्या, असे करणे अत्यंत शुभ मानले जाते.

Lamp | Canva