Priya More
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढासोबत लग्न करणार आहे.
दोघांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु असून २३ आणि २४ सप्टेंबरला ते विवाहबंधनात अडकणार आहेत. यासाठी त्यांनी लग्नाचे स्थळ फायनल केले आहे.
उदयमपूरमधील जग प्रसिद्ध आणि आलिशान हॉटेल लीला पॅलेस आणि द ओबेरॉय उदयविलासमध्ये त्यांचा लग्नाचे विधी पार पडणार आहे.
हॉटेल लीला पॅलेसमध्ये पंजाबी रितीरिवाजांनुसार दोघांचे लग्न होणार आहे. त्यासाठी या हॉटेलमध्ये जय्यत तयारीही सुरू झाली आहे.
उदयपूरचा लीला पॅलेस पिचोला तलावाच्या काठावर बांधण्यात आला आहे. जिथे संध्याकाळनंतरचे दृश्य अतिशय सुंदर दिसते.
परिणीती-राघवचे लग्नाचे कार्यक्रम लीला पॅलेस हॉटेलमध्ये होणार आहेत. तर लग्नाला आलेल्या पाहुण्यांना राहण्याची व्यवस्था द ओबेरॉय उदयविलास हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.
मेक माय ट्रीपच्या मते लीला पॅलेसमधील एका खोलीची (महाराजा सूट) एका रात्रीसाठी 8 ते १० लाखांपेक्षा जास्त किंमत आहे.
या पॅलेसमध्ये लाउंज, सलून, एक आऊटडोअर पूल, स्पा, बोटिंग, लाईव्ह लोकसंगीत यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
दोन महिन्यांपूर्वी राघव आणि परिणिती यांनी स्वत: हॉटेलला भेट देऊन लोकेशन पाहिले होते.
परिणीती चोप्रा आणि राघव यांचा साखरपुडा या वर्षी मे महिन्यात पार पडला होता. ज्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.