Ranveer Singh Photoshoot : रणवीर सिंहने ओलांडल्या सर्व मर्यादा! न्यूड फोटोजची होतेय सर्वत्र चर्चा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नेहमी आपल्या आगळ्या-वेगळ्या फॅशन आणि कपड्यांमुळे चर्चेत राहणारा बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह याची जगात चर्चा होतेय. रणवीरने यावेळी चक्क न्यूड फोटोशूट केले आहे.

ranveer singh | Instagram/@papermagazine

‘पेपर’ नावाच्या अमेरिकन मॅगझिनसाठी रणवीर सिंहने न्यूड फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये रणवीरच्या अंगावर एकही कपडा नसून तो पोज देताना दिसत आहे.

ranveer singh photoshoot | Instagram/@papermagazine

रणवीरच्या या बोल्ड फोटोंची चर्चा भारतासह जगभरात होतेय. रणवीरचं हे फोटोशूट अमेरिकी अभिनेता बर्ट रेनॉल्डच्या गाजलेल्या न्यूड फोटोशूटची आठवण करुन देणारं असल्याचं अनेकांनी म्हटलंय.

ranveer singh Nude photoshoot | Instagram/@papermagazine

न्यूड फोटोशूटबाबत एका मुलाखतीत रणवीर म्हणाला, 'नग्न राहणे माझ्यासाठी खूप सोपे आहे. माझ्या काही परफॉर्मन्समध्ये मी नग्न झालो आहे.

ranveer singh Naked photoshoot | Instagram/@papermagazine

पुढे तो म्हणाला, तुम्ही माझा आत्मा पाहू शकता. तो किती नग्न आहे? मी हजार लोकांसमोर नग्न होऊ शकतो. मला काही फरक पडत नाही. पण, ते अस्वस्थ होतात इतकेच.

ranveer singh photoshoot for papermagazine | Instagram/@papermagazine

रणवीरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी त्याचे समर्थन केले, तर अनेकांनी त्यावर टीकाही केली. यावर मीम्सही मोठ्या प्रमाणात बनवले जातायत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ranveer singh viral photoshoot | Instagram/@papermagazine