Satish Daud Patil
2 हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय आरबीआयने घेतला आहे.
क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटांचं सर्क्युलेशनही बंद करण्याचा निर्णय घेतला.
नागरिकांनी बँकांमध्ये जाऊन या नोटा बदली करून घेण्याचं आवाहन आरबीआयने केलं आहे.
30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा नागरिकांना बदलून मिळणार आहेत.
2016 साली देशभरात नोटबंदी झाल्यानंतर 500 आणि एक हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या.
या नोटाबंदीमुळे तूट भरून काढण्यासाठी आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईला सुरूवात केली.
2018-19 सालीच आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली होती.
दरम्यान एकावेळी नागरिकांना 2 हजार रुपयांच्या फक्त 10 नोटाच बँकेत बदलून मिळेल
म्हणजेच एकावेळी 20 हजार रुपयांपर्यंतच्याच 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहेत.