Rajat Patidar IPL 2022 : लिलावात होता अनसोल्ड, बदली खेळाडू म्हणून आला अन् केलं संधीचं सोनं

नरेश शेंडे

इंडियन प्रमियर लीगच्या (IPL) २०२२ च्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरचा फलंदाज रजत पाटीदारने चमकदार कामगिरी केलीय. पाटीदारने आरसीबीसाठी मोक्याच्या क्षणी ५४ चेंडूत ११२ धावांची आक्रमक खेळी केली. त्यामुळेच आरसीबीचा संघ दोनशे धावांचा टप्पा पार करु शकला.

Rajat Patidar | Instagram

रजन पाटीदारने लखनऊच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत ११२ धावांचं दमदार शतक ठोकलं. या खेळीत रजतने १२ चौकार आणि ७ षटकार ठोकले. २०० हून अधिकच्या स्ट्राईक रेटने पाटीदारने त्याच्या आयपीएलमधील पहिलं शतक केलं.

Rajat Patidar and dinesh karthik | Instagram

रजत पाटीदारने शतक ठोकून विक्रमी खेळी केली. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात जेवढे शतक केले, यामध्ये पाटीदारने केलेलं शतक हे सर्वाधिक वेगवान खेळीचं शतक आहे. पाटीदारने ४९ चेंडूत धडाकेबाज फलंदाजी करत १०० धावा कुटल्या.

Rajat Patidar | Instagram

रजत पाटीदारचाही आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये शतक करण्याच्या यादीत समावेश झाला आहे. यामध्ये विरेंद्र सेहवाग, शेन वॉटसन, रिद्धीमान साहा, मुरली विजय यांच्याही नावाचा समावेश आहे.

Rajat Patidar | Instagram

अनकॅप प्लेयर्सबद्दल बोलायचं झालं तर रजत पाटीदारचाही यामध्ये समावेश आहे. पाटीदार चौथा अनकॅप प्लेयर आहे, ज्यानं आयपीएलमध्ये शतक करण्यची अप्रतिम कामगिरी केली आहे. यापूर्वी पॉल वल्थाटी, मनीष पांडे, देवदत्त पडिक्कल यांनीही अशीच चमकदार कामगिरी केलीय.

Rajat Patidar and virat kohli | Instagram

रजत पाटीदार मूळचा मध्य प्रदेशचा आहे. यंदाच्या आयपीएलच्या लिलावात पाटीदार अनसोल्ड झाला होता. कोणत्याच संघांना त्याच्यावर बोली लावली नव्हती. त्यानंतर आरसीबीनेअनफीट असलेल्या एका खेळाडूला रिप्लेस करत २० लाखांमध्ये रजत पाटीदारला घेतलं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rajat Patidar | Instagram