#परीक्षांचाधंदाथांबवा: परीक्षांच्या राजकारणावर राज्यातील प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऐनवेळी आरोग्य विभागाची भरती परीक्षा रद्द झाल्याने परीक्षेसाठी जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. अकोल्यातील रेल्वे स्टेशनवर आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यातील विद्यार्थी परीक्षेसाठी मोठ्या आशेने आले होते. मात्र, ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना रेल्वे स्टेशनवरच रात्र काढावी लागली आहे. विद्यार्थ्यंच्या या हालमुळे राज्यातील प्रमुख नेत्यांनी टीकास्त्र सोडले आहे.

1) Pravin Darekar- विद्यार्थ्यांना जो मानस्ताप झाला त्याचा खर्च सरकारने द्यावा त्याच बरोबर खर्चाची जबाबदारी सरकारने घ्यावी अशी मागणी दरेकरांनी केली आहे. सरकारने एकत्रित केलेला हा महाघोटाळा आहे. नाना पटोले यांनीही महाघोटाळा असल्याचा आरोप केला आहे. या बाबत CBI, CID, निवृत्त न्यायधीशांमार्फत चौकशीची मागणी दरेकरांनी केली आहे.

2) Atul Bhatkhalkar- ‘आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळाला ‘भ्रष्टाचारी‘ महाविकास आघाडी सरकारच जबाबदार; काळ्या यादीतील कंपनीला कोणी काम दिले याची सीआयडी मार्फत चौकशी करा आ. अतुल भातखळकर यांनी केली मागणी.

3) Shrikant Deshpande- ज्या न्यासा कंपनीवर आधीपासूनच गुन्हे दाखल आहेत. अश्या कंपनीला परीक्षेचा कंत्राट देऊ नये, असे पत्र आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले होते. त्या पत्राची दखल जर घेतली गेली असती. तर आज परीक्षेसंदर्भात जो काही घोळ निर्माण झाला आहे. तो झाला नसता अशी प्रतिक्रिया माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.4) Devendra Fadnavis- आज दिवसभर परिक्षार्थींमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या परीक्षेमध्ये दलाल शिरले, असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

4) Devendra Fadnavis- आज दिवसभर परिक्षार्थींमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या परीक्षेमध्ये दलाल शिरले, असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.4) Rajesh Tope- न्यासा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गातील परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे न्यासा कंपनीची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

4) Rajesh Tope- न्यासा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गातील परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे न्यासा कंपनीची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.