या घरगुती टिप्सने कमी करा चेहऱ्यावरील मुरुमे

कोमल दामुद्रे

व्यस्त जीवनशैली, ऋतूमानानुसार व हार्मोन्समुळे त्वचेवर मुरुमे, डाग व सुरकुत्या येऊ लागतात.

आपल्या चेहऱ्याला यातून मुक्त करण्यासाठी आपण घरगुती टिप्सचा अवलंब करूया

बेकिंग सोड्याला पाण्यात मिसळवून चेहऱ्यावर लावावा व कोमट पाण्याने चेहरा धुवावा.

ओट्सचा लेप तयार करुन चेहऱ्यावर लावल्यास १५ मिनिटांने चेहरा धुवावा.

मुरुमांपासून मुक्ती मिळवण्यासाठी दालिचिनी पावडरमध्ये मध मिसळवून चेहऱ्यावर लावावे.

लसण्याच्या पाकळ्या वाटून मुरुमांना लावल्यास फायदा होईल.

हळदी व कोरफडाच्या जेलची पेस्ट तयार करुन चेहऱ्याला लावावा. त्यामुळे मुरुमांपासून मुक्तता मिळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.