Satish Daud Patil
मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरुला कुणी ओळखत नाही, असा व्यक्ती सापडणं कठीण आहे.
सैराट चित्रपटातून रिंकू राजगुरुने घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे.
रिंकूने सैराटमध्ये आर्चीची भूमिका साकारली होती, तिच्या अभिनयाचं आजही कौतुक केलं जातं.
अनेकांना रिंकू राजगुरुच्या खासगी जीवनाबद्दल जाणून घ्यायची खूपच इच्छा असते.
रिंकू राजगुरुने सातवीत असताना सैराट सिनेमाठी ऑडिशन दिलं होतं.
वयाच्या १४ व्या वर्षी रिंकूला सैराट सिनेमाची ऑफर मिळाली होती. तिचं खरं नाव प्रेरणा आहे.
रिंकूने करिअरच्या सुरुवातीला आपल्या शिक्षणाकडेही लक्ष दिलं होतं, तिला डॉक्टर होण्याची इच्छा होती.
रिंकू राजगुरुचे आई-वडील दोघेही एका मराठी माध्यम शाळेत शिक्षक आहेत.