Satish Daud Patil
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवारांना घेरण्यासाठी मोठा प्लान आखलाय.
अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करण्यासाठी आता राष्ट्रवादीकडून अर्ज करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी विधानपरिषद सभापतीकडे हा अर्ज केला आहे.
विशेष बाब म्हणजे, अपात्रतेच्या कारवाईसाठी एक अर्ज पुरेसा असताना, शरद पवारांकडून दुसरा अर्ज करण्यात आला.
शरद पवार यांच्या नव्या खेळीमुळे अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचं टेन्शन वाढलं आहे.
अपात्र होण्याच्या भीतीने अजित पवार गटातील काही आमदारांनी शरद पवारांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे.
नव्याने अपात्रतेची नोटीस काढलेल्या आमदारांपैकी काही आमदार पवारांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शरद पवार यांच्या नव्या खेळीमुळे राष्ट्रवादीचे आमदार परत येतील का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
NEXT: बायको नवऱ्याला 'या' गोष्टी कधीच सांगत नाही...