How To Control Overweight : सुटलेलं पोट कमी करायचंय?, आजपासूनच स्वत:मध्ये करा 'हे' बदल

कोमल दामुद्रे

वजन

वाढत्या वजनामुळे आणि सुटलेल्या पोटामुळे अनेकजण त्रस्त आहे. कितीही काही केलं तरी वजन काही आटोक्यात येत नाही.

काय खातो?

बरेचदा आपण काय खातो यापेक्षा आपण किती खातो हे देखील महत्त्वाचे आहे.

वाईट सवयी

वजन नियंत्रणाच्या नादात आपण उपासमार करतो यामुळे लठ्ठपणा वाढतो. वजन वाढू नये यासाठी कोणत्या वाईट सवयी सोडायला हवे हे जाणून घेऊया

वेळेवर अन्न खा

वेळेवर जेवल्यास आपल्या मधेच भूक लागत नाही तसेच विनाकारण खाणे टाळता येते.

पौष्टिक पदार्थ

आपल्या ताटात नेहमी पौष्टिक पदार्थ असायला हवे. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. आहारात फायबर आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा

पाणी

दिवसभर ६ ते ७ ग्लास पाणी प्या. तसेच जेवणापूर्वी १ ग्लास पाणी प्यायल्याने भूक नियंत्रणात राहाते.

सवयी

कोणत्याही वेळी खाण्याऐवजी दिवसातून तीन वेळी खाणे निश्चित करा. हळूहळू खाण्याच्या सवयी बदला.

भूक

अन्न पूर्णपणे चघळल्याने पचनाला मदत होतेच पण भूकही कमी होते.

स्नॅक्स

जर तुम्हाला मधेच भूक लागत असतील तर स्नॅक्सची सवय लावा. त्यात ड्रायफ्रूट्स आणि मखाण्याचा समावेश करा.

भूक

तुमच्या रोजच्या आहारात प्रथिनेयुक्त अन्न खाण्याची सवय लावा. प्रथिने भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

फायबर

आहारात कडधान्ये आणि हिरव्या भाज्यांसारखे फायबरयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेले वाटते.

Next : आठवडाभर खा भिजवलेले मनुके, हे ५ आजार होतील छुमंतर