ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
एक उत्तम अभिनेत्री आणि एक संवेदनशील कवयित्री म्हणून तिला ओळखले जाते.
नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
काही दिवसांपूर्वी मांसाहारी पदार्थांवर ताव मारण्यावरुन तिला ट्रोल करण्यात आले होते. आता तिने मांसाहार करण्यामागील कारण सांगितले आहे.
स्पृहा जोशीने नुकतंच ‘आसोवा' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिने मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये मांसाहारी पदार्थांवर ताव मारला.
या मुलाखतीत तिने तिच्या मांसाहार खाण्याची सुरुवात कुठून झाली, याबद्दल भाष्य केले.
स्पृहा लहानपणापासूनच मांसाहार प्रेमी आहे. ती पहिल्यापासूनच फूडी आहे.
तिला उत्तम नॉनव्हेज बनवता येते. पण तिच्या सासरच्या घरी करता येत नाही. कारण सासूबाई आणि नवरा दोघेही शाकाहारी आहेत.