बॉलिवूडच्या 15 अभिनेत्रींना महागडे गिफ्ट्स पाठवणारा सुकेश चंद्रशेखर आहे तरी कोण ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुकेश चंद्रशेखर हा एक ठग आहे. ज्याचे नाव बालाजी असे देखील आहे. वृत्तानुसार, हा ठग आहे आणि बोलण्याच्या कलेमध्ये पारंगत आहे आणि यामुळे तो कोणालाही सहजासहजी फसवत असे. सुकेश चंद्रशेखर 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.

मनी लॉन्ड्रिंग

वृत्तानुसार, अशी माहिती आहे की, सुकेश चंद्रशेखरने 2007 मध्ये 100 हून अधिक लोकांना फसवून आपला बळी बनवले होते.

सुकेश चंद्रशेखर

सुकेश चंद्रशेखर असे त्याचे नाव आहे. तर त्याचे वय (३२ वर्ष) असून त्याचा जन्म बंगलोर, कर्नाटक मध्ये झाला होता. तसेच तो विवाहित असून त्याच्या पत्नीचे नाव लीना मारिया पॉल असे आहे.

लीना मारिया पॉल

सुकेश चंद्रशेखरने लोकांना फसविण्याचे कामे बेंगळुरूपासून करायला सुरुवात केली होती. भारतातील विविध राज्यातील अनेक श्रीमंत लोक त्याच्या फसवणुकीचे आणि फसवणुकीला बळी पडले आहेत.

अलीकडेच एक फोटो व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तो प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला किस करत आहे. चर्चा आहे की, जॅकलीन फर्नांडिस त्याची गर्लफ्रेंड आहे. मात्र, सुकेश चंद्रशेखरसोबतच्या तिच्या फोटोबद्दल जॅकलीन फर्नांडिसने मौन बाळगले आहे.

जॅकलीन फर्नांडिस

त्यानंतर अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) चे नाव सुद्धा या प्रकरणात समोर आले होते. नोरा चौकशीसाठी सुद्धा ED कार्यालयात हजर राहिली आहे.

नोरा फतेही

या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या ईडीने सांगितले की, त्याचे श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि शिल्पा शेट्टीचे नावे समोर आली आहेत.

श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टी

त्यामुळे या प्रकरणात सुकेश चंद्रशेखर सोबत आत्तापर्यंत जॅकलीन फर्नांडिस, नोरा फतेही, श्रद्धा कपूर, शिल्पा शेट्टीसह अभिनेता कार्तिक आर्यन अश्या 5 बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांची नावे समोर आली आहेत.

आता सुकेश चंद्रशेखरकडून मिळालेल्या महागड्या गिफ्टमुळे बॉलिवूडच्या 15 नायिका रडारवर आहेत त्यामुळे त्यांची ईडीकडून चौकशीची होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दोनशे कोटी (200 Crores) रुपयांच्या मनी लाँड्रिंगप्रकरणी सुकेशला ईडीने अटक केली आणि या पैशांचा वापर सुकेशने हे महागडे गिफ्ट देण्यासाठी केला असल्याचा संशय ईडीला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.