Bailgada Sharyat: नाद एकच एकच एकच फक्त बैलगाडा शर्यत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बैलगाडा शर्यत

सध्या महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीचं फॅडच आलंय. पण याच बैलगाडा शर्यतीवरून वाद सुरू होता.

Bailgada Sharyat | Saam Tv

सुप्रीम कोर्टाचा निकाल

नुकताच बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीवर बंदी नाही असा निकाल दिला आहे.

Bailgada Sharyat | Saam Tv

बैलगाडा शर्यत विरोध

बैलगाडा शर्यती बंदीविरोधात लढा कसा होता? ते माहित करून घ्या

Bailgada Sharyat | Saam Tv

पर्यावरण मंत्रालय

११ जुलै २०११ ला केंद्रसरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने बैल या प्राण्याचा गँजेटमध्ये समावेश केला.

Bailgada Sharyat | Saam Tv

बैलगाडा शर्यतीवर बंदी

यानंतर महाराष्ट्र सरकारने २४ ऑगस्ट २०११ रोजी परिपत्रक काढून बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली.

Bailgada Sharyat | Saam Tv

निर्णयाला आव्हान

बैलगाडा मालक संघटनांनी प्राणी मित्र संघटनांच्या निर्णयाला आव्हान देत उच्च न्यायालयाचे दार ठोठावले.

Bailgada Sharyat | Saam Tv

नियम व अटी

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान, १५ फेब्रुवारी २०१३ ला काही नियम व अटी घालून तात्पुरत्या स्वरूपात शर्यंतींना परवानगी.

Bailgada Sharyat | Saam Tv

बैलांचा छळ

प्राणी मित्र संघटनांनी पुन्हा न्यायालयाचे दार ठोठावले आणि बैलगाडा शर्यतीमध्ये बैलांना मारहाण करण्यात येत असून बैलांचा छळ केला जातो असे न्यायालयात सांगितले.

Bailgada Sharyat | Saam Tv

कायद्याचे उल्लंघन

पुन्हा उच्च न्यायालयाने ७ मे २०१४ रोजी प्राणी कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी बंदी कायम केली.

Bailgada Sharyat | Saam Tv

आवाहन

१२ एप्रिल २०१७ ला राज्यसरकारने शर्यत सुरु करण्यासाठी कायदा तयार केला. मात्र कायद्याविरोधात प्राणीमित्रांनी हायकोर्टात आवाहन दिले.

Bailgada Sharyat | Saam Tv

कायद्याला स्थगिती

१६ ऑगस्ट २०१७ ला हायकोर्टाने राज्य सरकारच्या कायद्याला स्थगिती दिली.

Bailgada Sharyat | Saam Tv

बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील...

यानंतर आज सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दाखवला आहे. कोर्टाने आज दिलेल्या निकालात राज्यातील बैलगाडा शर्यत कायदा वैध ठरवला आहे.

Bailgada Sharyat | Saam Tv

NEXT: Gautami Patil: तुझ्या नावाचं मी इनिशल टँटूनं गोंदवलं ... गौतमीसाठी कायपण