Priya More
देशाला लवकरच नवीन संसद भवन मिळणार आहे. संसद भवनाची ही इमारत तयार झाली आहे.
येत्या रविवारी म्हणजे 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे.
नवीन संसद भवनाच्या इमारतीमध्ये लोकसभेसाठी 888 आणि राज्यसभेसाठी 384 जागा आहेत.
नव्या संसद भवनाच्या इमारतीत 1,272 खासदारांची आसनव्यवस्था असलेल्या लोकसभा सभागृहात संयुक्त अधिवेशन होणार आहे.
नवीन संसद भवन चार मजल्याचे आहे. तर जुने संसद भवन तीन मजल्यांचे आहे.
संसद भवनाची नवीन इमारत सुमारे 65,000 चौरस मीटरमध्ये बांधण्यात आली आहे.
संसदेच्या नवीन इमारतीचे डिझाईन एचसीपी डिझाईन या गुजरातमधील आर्किटेक्चर फर्मने केले आहे. तर बांधकाम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडने केले आहे.
नवीन संसद भवनाची इमारत तयार करण्यासाठी सुमारे 1,200 कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगितले जाते.