Ankush Dhavre
येत्या ३१ मार्चपासून आयपीएल २०२३ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत चौकार षटकारांचा पाऊस पाहायला मिळणार आहे.
या स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक मोठे विक्रम बनवले गेले आहेत आणि मोडले देखील गेले आहेत.
मात्र काही विक्रम असे आहेत जे मोडणं कठीण आहे.
विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांनी २०१६ मध्ये २२९ धावांची भागीदारी केली होती.
युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलच्या नावे अनेक विक्रमांची नोंद आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी खेळी (१७५ धावा) करण्याचा विक्रमही गेलच्या नावे आहे.
विराट कोहलीच्या नावे एकाच हंगामात सर्वाधिक ९७३ धावा करण्याचा विक्रम आहे.
आयपीएल स्पर्धेत सलग सर्वाधिक सामने (१० सामने) जिंकण्याचा विक्रम हा गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या नावे आहे.
रवींद्र जडेजा आणि ख्रिस गेल हे दोन खेळाडू आहेत ज्यांनी आयपीएलच्या एकाच षटकात ३७ धावा कूटल्या आहेत.