सर्वात मोठ्या टाटा उद्योगसमूहाची धुरा कोणाकडे?

साम टिव्ही ब्युरो

टाटा उद्योगसमूह हा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा भारतीय उद्योगसमूह आहे.

TATA | Saam Tv

टाटा हा भारतातल्या सर्वात मोठ्या खाजगी उद्योगसमूहांपैकी एक आहे.

TATA | Saam Tv

रसायने, पोलाद, वाहननिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, दूरसंपर्क, ऊर्जा, चहा या क्षेत्रांत या समूहातील कंपन्या प्रामुख्याने आघाडीवर आहेत.

TATA | Saam Tv

टाटा समूहाची सुरुवात १८६८ मध्ये भारतात ब्रिटिश राजवट असताना जमशेटजी नसरवानजी टाटा यांनी हिंदुस्थानात कापसाचे व्यवहार करणाऱ्या कंपनीने स्थापना केली.

TATA | Saam Tv

त्यानंतर नागपूरमध्ये १८७७ मध्ये एम्प्रेस मिल्सची स्थापना झाली.

TATA | Saam Tv

१९०४ मध्ये जमशेटजींच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र 'दोराबजी टाटा' समूहाचे चेअरमन झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली समुहाने पोलादनिर्मिती आणि जल विद्युतनिर्मिती प्रकल्प सुरू केले.

TATA | Saam Tv

सर दोराबजी टाटा यांच्या मृत्यूनंतर १९३४ मध्ये नवरोजी सकलातवाला यांनी पुढची सुमारे चार वर्षे समूहाची धुरा सांभाळली.

TATA | Saam Tv

१९३८ मध्ये जहांगीर रतनजी दादाभाई अर्थात जे.आर.डी. टाटा हे या समूहाचे चेअरमन झाले.

TATA | Saam Tv

टाटा केमिकल्स, टेल्को (आता टाटा मोटर्स), टाटा इंडस्ट्रीज, टाटा टी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि टायटन इंडस्ट्रीज ही रतनजी यांनी सुरू केलेल्या कंपन्यांची नावे आहेत.

TATA | Saam Tv

रतन टाटा यांनी जेआरडींकडून १९९१ मध्ये सूत्रे स्वीकारली.

TATA | Saam Tv

२०१६ मध्ये सायरस मिस्त्री टाटा समूहातून बाहेर पडले. २०१७ पासून नटराजन चंद्रशेखरन यांनी चेअरमनपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.

TATA | Saam Tv