Kardora On Mens Waist: पुरूषांच्या कमरेला करदोरा का बांधतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रथा - परंपरा

आपल्याकडे अनेक प्रथा,परंपरा या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. त्यापेकी एक म्हणजे पुरूषांच्या कमरेला असणारा करदोरा

Tips | Saam Tv

त्यापैंकी एक म्हणजे 'करदोरा'

करदोऱ्याप्रमाणेच याला 'कटदोरा' किंवा 'करगोटा' असेही संबोधले जात असे.

Tips | Saam Tv

नवजात बालकाला करदोरा बांधतात

आपल्याकडे पूर्वीपासून मुल जन्माला आलं की सुईन त्याच्या कमरेला करदोरा म्हणजेच काळा धागा बांधते.

Tips | Saam Tv

नजर लागू नये म्हणून बांधतात

करदोरा का बांधला जातो यामागचे लिखित शास्त्र नाही. मात्र असे बोलले जाते की नवजात बाळाला कुणाची नजर लागू नये संरक्षण म्हणून काळा धागा बांधतात.

Tips | Saam Tv

करदोरा म्हणजे काळा रेशीम धागा

करदोराचा काळा रंग उष्णता जास्त वेळ रोखून ठेवतो म्हणून काळे रेशीमच यासाठी वापरले जाते तसेच कंबरे भोवती घर्षण होईल आणि तो गोलाकार फिरू शकेल इतपतच तो बांधला गेला पाहिजे

Tips | Saam Tv

करदोरा कमरेला बांधतात

कंबर हा शरीराचा रुंद भाग असल्याने रोग्याच्या अनेक तक्रारी या पोटापासून सुरु होतात. अशावेळी कंबरेला दोरा बांधल्याने त्याला होणारी बाधा ही आवळली जाते आणि पोटदुखी होत नाही.

Tips | Saam Tv

आरोग्यासाठी गुणकारी

पूर्वीच्या काळी पावला पावलावर डॉक्टर नव्हते. त्यामुळे एखादा इलाज करायचा असेल तर त्यासाठी वाट पाहावी लागायची. अशावेळी करदोरा हा तात्पुरता आराम देण्यासाठी चांगला मानला जात होता.म्हणून प्रत्येकाच्या कमरेला करदोरा बांधला जायचा

Tips | Saam Tv

प्रथमोपचार

जंगल किंवा शेतात काम करताना पोटाला करदोरा बांधला जाई. कारण अशाठिकाणी सर्प दंशाची भिती अधिक होती. सर्पदंश शरीरात भिनू नये यासाठी कमरेत करदोरा बांधला जाई.

Tips | Saam Tv

NEXT: Banana Fruits|केळी कधी खावी? जेवणाआधी की नतंर

Banana Fruit | Canva