आजची नारी नाजूक आहे, कुमकुवत नाही

साम टिव्ही ब्युरो

२१ व्या दशकातील २०२२ या वर्षात आपण जगत आहोत.

मागील अनेक वर्ष बरेच बदल झाले, पण एक गोष्ट जशीच्या तशी आहे आणि ती म्हणजे समाजातील महिलांची स्थिती.

राजकीय सामाजिक आणि व्यवसायिकरित्या स्त्री प्रबळ झाली आहे.

मात्र तरी देखील स्त्रीला सामाजातील वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो आहे.

अलीकडेच पत्रकार महिलेंशी टिकली लावल्यास संवाद साधू याप्रकारचे वक्तव्य करण्यात आले होते.

सध्या महिलांवरील अत्याचार, हत्या, बलात्कार यासांरख्या घटना वेग धरू लागल्या आहेत.

मात्र नारीशक्ती सक्षम आहे, जी जिजाऊ प्रमाणे लढा देत राहील .