चिंचखेड गावातील ४४ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण 

Vaccination
Vaccination

अमरावती : मेळघाट Melghat म्हटलं की आदिवासी Tribals बहुल परिसर आणि हा परिसर कुपोषण व गरोदर महिला मृत्युने चर्चेत असतो..तर इलाज करण्यासाठी सरकारी आरोग्य Health यंत्रणे पेक्षा  बुवाबाजीवर जास्त विश्वास असलेला परिसर. पण याच परिसरामध्ये कोरोनाला घेऊन एक विक्रमी बाब समोर आली ती म्हणजे या परिसरातील चिंचखेड ह्या गावातील ४४ वर्षांवरील नागरिकांचे  कोरोना लसीकरण Corona Vaccination १०० टक्के झाले आहे.Amravati Village Completed 44 plus Vaccination

अमरावती Amravati जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील चिंचखेड गाव हे सातपुड्याच्या पर्वतरांगेत च्या पायथ्याशी वसलेलं गाव या गावात आदिवासी आणि इतर जातीची लोक राहतात. ६०५ लोकसंख्या असलेलं हे गाव कोरोनाच्या  भीतीने भयभीत होतं. २०१९ मध्ये जसा कोरोना  भारतात व राज्यात शिरला, त्यावेळी नागरिकांनी आणि येथील सरपंच पोलिस Police पाटील तंटामुक्ती अध्यक्ष यांनी गावाच्या सीमा बंद केल्या बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी शाळेमध्ये विलीगीकरणात ठेवले.

हे देखिल पहा

गावात भीती इतकी होती ही चाचणी करायला सुद्धा कोणी तयार नव्हते. डॉक्टरांनी लोकांना याबाबत समय सूचकता ठेवत समजावण्याचा प्रयत्न केला. पण चाचणीला कोणी पुढे येईना. यातूनच गावातील पोलीस पाटील बबलू अजमेरा यांनी आपल्या सहकार्यांसोबत पुढाकार घेत स्वतःची चाचणी केली आणि आदिवासी नागरिकांना  एक भरोसा दिला. त्यामुळे लोक समोर आले आणि चाचणी करू लागले. Amravati Village Completed 44 plus Vaccination

यात पाच ते सहा लोक पॉझिटिव आले. पण यातही कोरोना पॉझिटिव्ह झाले की अमरावतीच्या किंवा परतवाड्याच्या कोरोना सेंटरमध्ये मनुष्य जातो आणि तिकडून आपली राखच परत येते या भीतीला दूर करण्यासाठी डॉक्टरांनी Doctor भरोसा दिला की आपण गावातच याचा गोळ्या  इंजेक्शन देऊन इलाज  करू शकतो तुम्ही स्वतः घरातच विलगीकरण होऊ शकता आणि तसेच झाले व गावकऱ्यांना विश्वास बसला....

आणि गावकरी चाचणीला पुढे येऊ लागले.... आजही या गावात चार ते पाच कोरोना पॉझिटिव्ह आहेत... त्यांचे इलाज गावातच घरी बसल्या सुरू आहेत.आरोग्य यंत्रणा दिसली तर गावकरी रानात पळून जायचे. पण त्यांना आरोग्य यंत्रणेवर आम्ही विश्वास ठेवायला लावला आणि संपूर्ण तपासणी केली.

या भागातील नागरिकांचे आरोग्य यंत्रणे पेक्षा त्यांच्या येथील बुवाबाजीवर जास्त विश्वास आहे. पण आम्ही रात्रंदिवस गावकऱ्यांच्या संपर्कात राहिलो व विश्वास जिंकला. हळूहळू एक एक करून गावकरी आमच्यावर विश्वास ठेवायला लागले आणि आज असा चमत्कार झाला या गावचे चव्वेचाळीस वर्षे वयावरील सर्व व्यक्तींचे व्हॅक्सिनेशन आम्ही पूर्ण केले आहे. हा आनंद काही वेगळाच आह, असे डॉ.गौरव चौधरी यांनी सांगितले.Amravati Village Completed 44 plus Vaccination

कोरोनाविषयी भायभीत असलेल्या गावकऱ्यांनी कोरोनाशी लढाई जिंकण्यासाठी आपलं लसीकरण पूर्ण केलं असून आता भीती गेली आहे. आता आम्ही बाकी सर्व मेळघाटातील सर्व नागरिकांना चाचणी करणे आणि लसीकरण करणे यासाठी प्रवृत्त करू, असे येथील युवक अमोल वाघमारे यानं सांगितलं.

मेळघाट मधील या गावात आता ४४ वर्ष वरील बागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून आता युवकांमध्ये ही लसीकरणासाठी उत्साह दिसून येत आहे 

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com