कोरोनाची धास्ती ते संपूर्ण कोरोनामुक्ती...जुनी भारवाडीचा विक्रम

अरुण जोशी
मंगळवार, 25 मे 2021

वर्धा जिल्हा सीमेवर अमरावती जिल्ह्यातील शेवटचे गाव तिवसा तालुक्यातील जुनी भारवाडी. या गावात काही दिवसांपूर्वी कोरोनाने जणू उच्छाद मांडला होता .केवळ ३०० ते ३५० लोकसंख्या असलेल्या या गावात, केवळ २ आठवड्यात कोरोनाचे तबल ५७ रुग्ण आढल्याने प्रशासनाची झोप उडाली होती. गाव कोरोनाच्या दहशतीखाली वावरत होते. 

अमरावती  : वर्धा जिल्हा सीमेवर अमरावती जिल्ह्यातील शेवटचे गाव तिवसा तालुक्यातील जुनी भारवाडी. या गावात काही दिवसांपूर्वी कोरोनाने जणू उच्छाद मांडला होता .केवळ ३०० ते ३५० लोकसंख्या असलेल्या या गावात, केवळ २ आठवड्यात कोरोनाचे तबल ५७ रुग्ण आढल्याने प्रशासनाची झोप उडाली होती. गाव कोरोनाच्या दहशतीखाली वावरत होते. Amravati Village Fully Corona Free for more than Fifty Days

मात्र त्याचवेळी आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन व गावकऱ्यांनी कोरोनाला आता थांबवायचे हा निर्णय घेतला.. आणि गावासाठी व स्वतःच्या सुरक्षेसाठी उपाययोजना सुरु केल्या.कोरोना नियमांची कडक अंबलबजावनी गावात अमलात आणली.. आणि त्याचाच फायदा हा जुनी भारवाडी या गावाला झाला. पंधरा दिवसात ५७ कोरोना बाधित रुग्ण आढळणाऱ्या या गावात  एक महिन्यापासून एकही नवा कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही.

हे देखिल पहा

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील जुनी भारवाडी हे जवळपास ३५० लोकवस्तीचे गाव आहे.मागील १ वर्षांपासून देशात कोरोनाचे सावट आहे.खेड्यापाड्यातील गावोगावी कोरोना शिरला होता.पण भारवाडी या गावाने ११ महिने कोरोनाला गावाच्या वेशीवर रोखले होते. पण यंदा अखेर २५ मार्च ला पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला आणि गावात खळबळ उडाली. तेथून ३ दिवसात लगेचच आणखी ३ नव्या रुग्णांची भर त्यात पडली होती. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन,आरोग्य विभागासमोर आव्हान उभे होते. Amravati Village Fully Corona Free for more than Fifty Days

साथी हाथ बढाना म्हणत गावाने उभे केले वीजेचे खांब

त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत या गावात कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले. केवळ १५ दिवसांत ५७ कोरोना बाधित आढळनारे आणि तेही इतक्या कमी लोकसंख्याच्या गावात अस जिल्ह्यातील एकमेव गाव जुनी भारवाडी असावे.या गावांतील लहान बालके वगळले तर १०० टक्के लोकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहे. जवळपास ३५० लोकसंख्या असलेल्या या गावात एकूण २३१ चाचण्या केल्या गेल्या

गावात १५ दिवसांत ५७ रुग्ण आढल्याने कमालीची भीती पसरली होती.त्यामुळे गावात जिल्हास्तरावरील व तालुका स्तरांवरील आरोग्य अधिकारी यांनी भेटी दिल्या गावांतील लोकांचे समुपदेशन केले.त्यांना आरोग्य विभागाने योग्य तो औषधसाठा दिला.एवढया मोठया संख्येने रुग्ण आढल्याने गाव प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित केले. त्यामुळे गावाबाहेर व्यक्तीला गावात प्रवेश नव्हता तर गावांतील व्यक्तीला गावाबाहेर जात येत नव्हते. आढळलेल्या रुग्णापैकी ९०% रुग्ण हे लक्षणेंरहित असल्याने त्यांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले होते. Amravati Village Fully Corona Free for more than Fifty Days

जे रुग्ण होम आयसोलेशन मध्ये होते त्या रुग्णांच्या घरांवर आयसोलेशन चा बोर्ड लावण्यात आला होता.जे लोक या नियमांचे पालन करणार नाही त्याच्यावर कारवाईचा इशारा देण्यात आला होता.दरम्यान गावातील कोरोना हटवण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ ज्योत्सना पोटपीटे,सचिव पी एच देशमुख,गटप्रवर्तक प्रतिभा मकेशवर,आशा सेविका संगीता कडु,एएनएम,एमपीडब्लू, सिएचओ मार्फत गावात वेळोवेळी पाहणी तपासणी करन्यात आली .तसेच वेळोवेळी फवारणी त्यामुळे हे गाव कोरोना मुक्त झाले आहे.कारण मागील एक महिन्यापासून या गावात एकही नवा कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही...
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live