कमोडमध्ये टाकलेले बाळ प्लशमध्ये अडकले आणि....

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 24 डिसेंबर 2018

अमृतसरः रेल्वेच्या कमोडमध्ये एका बाळाला टाकून देण्यात आले होते. परंतु, ते प्लशमध्ये अडकले. बाळाला हात लावला तेंव्हा त्याचा श्वास सुरू होता. तत्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देव तारी त्याला कोण मारी... या म्हणीचा प्रत्यय आला आहे.

आई-वडिलांच्या नावाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. केवळ कमोडच्या फ्लशमध्ये अडकल्यामुळे एक दिवसाच्या बाळाचा जीव वाचू शकला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हावडाहून अमृतसरला रेल्वे दाखल झाली होती. रेल्वेची साफ सफाई सुरू असताना एसी डी-३ डब्यात कर्मचाऱ्यांना कमोडमध्ये एक नवजात बाळ आढळले. बाळाला ओढणीने गुंढाळून कमोडमध्ये टाकले होते. परंतु, केवळ प्लशमध्ये अडकल्यामुळे खाली जाऊ शकले नाही. सफाई कर्मचाऱ्याने याबद्दलची माहिती तात्काळ अधिकाऱ्यांना कळवली. बाळाला कमोडमधून जेव्हा बाहेर काढण्यात आले तेव्हा बाळाचा श्वास सुरू होता. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या बाळावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या भयंकर घटनेमुळे पंजाबमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

कडाक्याची थंडी आणि फक्त ओढणीमध्ये गुंढाळून बाळाला कमोडमध्ये टाकून देण्यात आले होते. दैव बलवत्तर म्हणूनच बाळ सुदैवाने बचावले आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. पोलिस या संपूर्ण प्रकाराचा कसून तपास करणार असून, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

Web Title: Amritsars miracle baby boy: Flushed down train toilet recovered alive

संबंधित बातम्या

Saam TV Live