ट्रोल करण्यांना भीत नाही, बोलतच राहणार- अमृता फडणवीस

राजू सोनावणे
सोमवार, 9 मार्च 2020

अनेकदा अमृता फडणवीस यांना ट्रोल केलं जातं. तसंच त्यांचं विचार हे पती देवेंद्र फडणवीस यांचेच विचार असतात का? या अशा अनेक मुद्द्यांवर अमृता फडणवीस यांनी सडेतोड उत्तरं दिली आहे. महिला दिनीनिमित्त त्यांची विशेष मुलाखत साम टीव्हीने घेतली.

मुंबई - अमृता फडणवीस. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी. ही एवढीच काही फक्त अमृता फडणवीस यांची आता ओळख राहिलेली नाही. त्यांनी आपलं असं स्वतःच वेगळं अस्तित्वही तयार केलंय. गायिका म्हणूनही त्या ओळखल्या जातात. सोशल मीडियावर त्या आपल्या विचारांना वाट मोकळी करुन देत असतात. 

 

हेही पाहा - Must Watch : Maharashtra CM Devendra Fadnavis 'sings'

हेही वाचा  - राज ठाकरेंनी फडणवीसांची नाव न घेता उडवली टिंगल

 

अनेकदा अमृता फडणवीस यांना ट्रोल केलं जातं. तसंच त्यांचं विचार हे पती देवेंद्र फडणवीस यांचेच विचार असतात का? या अशा अनेक मुद्द्यांवर अमृता फडणवीस यांनी सडेतोड उत्तरं दिली आहे. महिला दिनीनिमित्त त्यांची विशेष मुलाखत साम टीव्हीने घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. महिलांना समान न्यान मिळवून देण्यासोबत, आदित्य ठाकरेंसोबत बांगड्यांवरुन झालेल्या वक्तव्याचा वाद, यासांराख्या अनेक प्रश्नांवर त्यांनी मोकळेपणे उत्तरं दिली आहेत. ट्रोल करणाऱ्यांनी भीत नाही, असंही अमृता फडणवीस यांनी यावेळी म्हटलंय. मला जे योग्य वाटतं, पटतं, ते बोलत राहणार, असं उत्तर अमृता फडणवीस यांनी ट्रोल करणा-यांना दिलं आहे. 

शिवसेना भाजपच्या तुटलेल्या युतीवरही त्यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला. यावरही त्यांनी परखड मत मांडलंय. काय म्हणाल्यात, अमृता फडणवीस... पाहा व्हिडीओ - 

WEB विशेष | मिसेस फडणवीसांना कोण मारतंय बाण?

 

amruta fadanvis on trolles exlcusive interview  video


संबंधित बातम्या

Saam TV Live