अमृतावहिनींचा ठाकरे सरकारला पुन्हा एकदा सल्ला

सरकारनामा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

राज्यात गेले काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. सातत्याने अशा घटना घडत असताना समाजात आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली असून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करुन जलद कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याबाबत विविध स्तरावरून मागणी होत होत आहे. त्यामुळे अशा घटनांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्यसरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केलीआहे.

मुंबई :  बाळासाहेब ठाकरेंचे खरं स्वप्न आता जमिनीवर येऊन पूर्ण करा, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हिंगणघाटमध्ये पेट्रोल टाकून एका प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर औरंगाबादमध्ये बिअर बार चालकाने घरात घुसून महिलेला जिवंत जाळले. यात पीडित महिलेचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांनी सध्या महाराष्ट्र हादरला आहे.

 

या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खरं स्वप्न आता जमिनीवर येऊन पूर्ण करा, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. आपल्यातील भांडणे विसरुन-सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे आवश्‍यक आहे, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.

मुनगंटिवार यांची ही मागणी...
स्त्रीयांवरील वाढते अत्याचार रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी चर्चेसाठी एक दिवस स्वतंत्र राखीव ठेवावा, अशी मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्राद्धारे केली आहे.

राज्यात गेले काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. सातत्याने अशा घटना घडत असताना समाजात आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली असून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करुन जलद कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याबाबत विविध स्तरावरून मागणी होत होत आहे. त्यामुळे अशा घटनांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्यसरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live