शिवसेना -भाजप राडा आणि महापालिका निवडणूक

जवळपास २५ वर्ष सख्ख्या भावाप्रमाणे एकत्र युतीत राहिलेले शिवसेना Shivsena आणि भाजप BJP हे दोन्ही राजकीय पक्ष काल भरदिवसा रस्त्यावर हाणामारी करताना दिसून आले. निमित्त होत ते राम मंदिराच्या Ram Mandir जमिनीच्या घोटाळ्याबाबत शिवसेनेने केलेली चौकशीची मागणी आणि त्यामुळे भाजपच्या दुखावल्या गेलेल्या भावना... मात्र त्यातही पडद्यामागच्या बाब काहीशी वेगळी असल्याचं कळतंय
मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना-भाजप राड्याचे कारण?
मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना-भाजप राड्याचे कारण?Saam TV

गेल्या दीड वर्षांपासून म्हणजेच जेव्हापासून महाविकास आघाडीची Maha Vikas Aghadi स्थापना झाली अगदी तेव्हापासून शिवसेना आणि भाजपमध्ये विस्तव जात नसल्याचं दिसून येतय. गेल्या २५ वर्षात गुण्यागोविंदाने एकत्र राहिलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये महाविकास आघाडीनंतर ताणलेले संबंध हे नेहमीच चव्हाट्यावर आलेले पाहायला मिळाले.

हे देखिल पहा

मग ते राजकीय Political अस्तित्व टिकवण्यासाठी असो , वा प्रभू श्री रामांच्या Ram निमित्ताने उपस्थित राहिलेला हिंदुत्वाचा Hindutva मुद्दा... मात्र काल शिवसेनाभवन परिसरात झालेला राडा म्हणजेच ताणून तुटलेल्या संबांधांची ही उच्च पातळीचं म्हणावी लागेल. यातही शिवसेनेचा वाघ आणि सोनिया सेना वगैरे घोषणाबाजीची झालर तर होतीच, पण यात आरोप प्रत्यारोपांसह औरंगजेब आणि अफजल खान सारख्या इतिहासकालीन शत्रूच्या उपमाही तितक्याच कडवटपणे देण्यात आल्या. Analysis of Shivsena BJP Ruckus in Mumbai Yesterday

तब्बल २० मिनिट चाललेला हा राडा हा केवळ राडा नव्हता, तर ती सुरुवात होती महापालिका निवडणुकीसाठीची.... आगामी महापालिका निवडणुका येत्या आठ महिन्यात आहेत. अशातच मागील निवडणुकीचा राग हा भाजपमध्ये सातत्याने दिसून येतो. मागच्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप या दोघांनाही उत्तम यश मिळालं होतं.

मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना-भाजप राड्याचे कारण?
शिवसेना भवनावर हल्ला करण्याची कोणाची हिम्मत नाही - संजय राऊत

मात्र मुंबईत 'आवाज फक्त शिवसेनेचाच' अशी घोषणा देत शिवसेनेने अपक्ष आणि मनसेच्या काही नगरसेवकांना हाताशी धरून आपले संख्याबळ वाढवलं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला जास्त संख्या बळ असूनही सत्ता स्थापन करता आली नाही . त्यामुळे भाजपमध्ये सातत्यानं यासंदर्भातला राग ही दिसून येतो. अशातच मुंबईमध्ये या दोन्ही पक्षांचे नेते पदाधिकारी अगदी कार्यकर्ते एकमेकांना सातत्याने घडत असल्याचं चित्र दिसून येतं. दोन्ही पक्षाचे राजकीय नेते एकमेकांना अनेकदा खुन्नस देतानाही दिसून येतात. Analysis of Shivsena BJP Ruckus in Mumbai Yesterday

गेल्या महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीचा जर आपण विचार केला, तर या दोन्ही निवडणुकीमध्ये भाजपला आधीच्या निवडणुकीपेक्षा बऱ्यापैकी यश मिळालय. त्याच ठिकाणी शिवसेनेचे देखील धास्ती वाढली आहे. अशातच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचा झेंडा पालिकेवर येण्यासाठी सध्या भाजपतर्फे प्रयत्न केले जात आहेत. तर सत्तेत असलेली शिवसेना या संदर्भात आपली राजकीय मांडणी देखील करत असलेली दिसून येते. मागच्या अपयशाची कसर भरून काढण्यासाठी भाजपचे नेते प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे. त्यासाठी राम जन्मभूमी जमिनीचा घोटाळा प्रकरण तर निमित्त ठरलंय. मात्र त्यानिमित्ताने अनेक महिन्यांपासून ची खुन्नस, संघर्ष या राड्याच्या निमित्तानं दिसून आलाय.. हे मात्र नक्की...

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com