'खेला होबे' पुढे 'परिबर्तन होबे' ठरले निष्प्रभ!

विहंग ठाकूर
रविवार, 2 मे 2021

बंगाल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या २० सभा आणि  अमित  शाह यांच्या ४५ सभांचा  प्रभाव  बंगाली  जनतेवर पडला  नाही. ममता दीदींचा " खेला होबे " या निवडणूक घोषणेपुढे  भाजपची 'परिवर्तन  होबे घोषणाही फिकी पडली.

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल West Bengal मध्ये तृणमूल  काँग्रेस Trinamool Congress ने २०० च्या वर जागा मिळवत बाजी  मारलीय.  तर अबकी  बार  २०० पार  म्हणणारी  भाजप BJP बंगालमध्ये  १०० चा आकडा  सुद्धा  गाठू  शकलेली नाही. त्यामुळे  ममतादीदी  तिसऱ्यांदा  मुख्यमंत्री  पदी विराजमान  होणार  आहेत. आणि  भाजप १०० जागा पार करणार नाही हा  प्रशांत  किशोर Prashant Kishore यांचा  दावाही खरा ठरतोय. Analysis of Win of Mamata Banerjee in West Bengal Elections

बंगाल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या Narendra Modi २० सभा आणि  अमित  शाह Amit Shah यांच्या ४५ सभांचा  प्रभाव  बंगाली  जनतेवर पडला  नाही. ममता दीदींचा Mamata Banerjee " खेला होबे " या निवडणूक घोषणेपुढे  भाजपची 'परिवर्तन  होबे घोषणाही फिकी पडली.

ममता बॅनर्जींच्या विजयाचे हे थोडक्यात विश्लेषण 

►बंगाली  जनतेमध्ये  ममता  दीदींवरील लोकांचा  विश्वास कायम आहे, त्यांची लोकप्रियता  कायम आहे 

►ममता बॅनर्जी  यांचे  सहानभूती  कार्ड चाललं

► ममता  बॅनर्जी  याना  सॉफ्ट  हिंदुत्वाचा  फायदा  झाला. ममतांचा चांदीपाठ लोकांना  भावला

► भाजपचा  आक्रमक  प्रचार  फेल 

► ओवेसी आणि  अब्बास  सिद्दकी मुस्लिम  नेत्यांपेक्षा मुस्लिमांनी  ममतांनाच  मत  दिली

► ममतांदीदीं चा भाचा आभिषेख  बॅनर्जी  यांच्यावरील कोळसा  खान  घोटाळा  आरोप झाले,  त्याची  केंद्रीय एजन्सी चौकशी हि झाली ,पण  हा भाजपचा निवडणूक  मुद्दाही  बंगाली  जनतेने  नाकारला 

► ममता दीदींचा 'बाहरी'  विरुद्ध बंगाली  मुद्दा प्रभावी  ठरला Analysis of Win of Mamata Banerjee in West Bengal Elections

बंगालमध्ये  भाजपचि रणनीती का फेल झाली. 
► ममता बॅनर्जी वर  व्यक्तिगत  शाब्दिक  विधानांमुळे भाजपला नुकसान 

► भाजपचं  मतूआ समाजाचं कार्ड  फेल, मतुआ  समाजाला आपल्या कडे  खेचण्याचा भाजपचा प्रयत्न, मात्र  मतूआ समाजाची मत टीएमसी  आणि  भाजपात  विभागली

► मुस्लिम मत  विभागली नाहीत. उलट  हिंदू  मतांमध्ये विभागणी

► भाजपने मुख्यमंत्री पदाचा उमेवार दिला  नाही

►भाजपाकडे निवडणूक  प्रचार यंत्रणा  असली, तरी  सर्वच  मतदार  संघात मजबूत  संघटना  नाही 

► टीएमसीतून आयात  नेत्यांचा निवडणूक फायदा  झाला  नाही Analysis of Win of Mamata Banerjee in West Bengal Elections

बंगालच्या  निकालांचा  देशाच्या  राजकारणात  काय  परिणाम  होणार
► पंतप्रधान मोदीं विरोधात  प्रमुख  चेहरा  म्हणून  ममता  दीदींचा  चेहरा पुढे  येणार 

► राष्ट्रीय पातळीवर   भाजप  विरोधात  पुन्हा  तिसऱ्या  आघाडीचा  प्रयत्न  होऊ  शकतो

► युपी आणि  पंजाब   उत्तराखंड विधानसभा  निवडणुकीत भाजप विरोधात नवी आघाडी होऊ शकते

► आगामी  काळात  भाजपला  निवडणूक रणनीती  बदलावी  लागेल

►राजस्थान,  महाराष्ट्र  मध्ये भाजप कडून  ऑपरेशन  कमल  पुढे ढकलले जाऊ  शकतं

►भाजप हा ३ जागांवरून ८० च्या पार गेला. मात्र लोकसभा निवडणुकीत १२१ विधानसभा मतदार सांगत आघाडी घेणारा भाजप हा विधासभा निवडणुकीत  मागे  राहिला असेच  चित्र आहे

► भाजपने आता  डावे पक्ष आणि  काँग्रेस  यांची  जागा  घेतलीयआणि  ममता दीदींनी  आपलं  सत्ता तेवढ्याच बहुमताने  आणि  अधिक मताधिक्य  घेऊन कायम ठेवली आहे 

►परिवर्तन होबे साठी  भाजपाला  पुढील  विधानसभा निवडणुकी पर्यंत वाट  पाहावी  लागेल एवढे  मात्र  नक्की
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live