''राणा दांपत्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल करणार''

अरुण जोशी
शुक्रवार, 11 जून 2021

नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी कशा पद्धतीने सर्व खोटे कागदपत्र जमवून जनतेची कशी फसवणूक केली हे अडसूळ यांनी सांगितले.

जे लोक स्वतः घाणेरडे राजकारण करतात त्यांना दुसरे लोक देखील घाणेरडे वाटतात अशा शब्दात अडसूळ यांनी राणा दांपत्यावर टीका केली. न्यायालयाच्या निर्णयानंतर अडसूळ यांचे प्रथमच अमरावती शहरात आगमन झाले त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राणा दांपत्यावर गंभीर आरोप करीत त्यांच्यावर फौजदारी खटला भरणार असल्याची माहिती दिली.(Anandrao Adsul said he would file criminal cases against Navneet Rana and her husband)

अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर जिल्ह्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी सरकारने आपल्या विरोधात आलेल्या निर्णयासाठी नक्कीच काहीतरी खिचडी शिजवली असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केल्या नंतर आज माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी देखील राणा यांना जशास तसे उत्तर देत चांगलाच समाचार घेतला.

हे देखील पाहा

आज माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे जिल्ह्यात आगमन होताच शिवसैनिकांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. त्यानंतर अडसूळ यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मागील आठ वर्ष लढलेल्या या न्यायालयीन प्रक्रियेची संपूर्ण माहिती सांगितली.

सावधान! तुमच्या फेक प्रोफाईल बनवून कोणी तरी मागतंय पैसे

नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी कशा पद्धतीने सर्व खोटे कागदपत्र जमवून जनतेची कशी फसवणूक केली हे अडसूळ यांनी सांगितले. तसेच राणा दांपत्याने कशा प्रकारे या खटल्याशी संबंधित व्यक्तींवर दबाव आणला, त्यांना धमक्या दिल्या आणि मारण्याचे प्रयत्न केले या सर्व बाबी अडसूळ यांनी माध्यमांसमोर उघड केल्या. याशिवाय आपण राणा दांपत्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले देखील दाखल करणार असल्याचं आनंदराव अडसूळ यांनी सांगितले.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


संबंधित बातम्या

Saam TV Live