...आणि मुंबई इंडियन्सचा संघ 'अलेक्सा' झाला!

रवि पत्की
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

आणि मुंबई इंडियन्सचा संघ 'अलेक्सा' झाला.

मुंबई संघाच्या व्यवस्थापनाने आपल्या संघाला फर्मान केले'अलेक्सा बुमराहला सांग तुझे बेस्ट यॉर्कर्स टाक'.अलेक्सा म्हणाली' बुमराह बेस्ट यॉर्कर टाकेल'.मग सांगितले गेले'अलेक्सा ट्रेंट बोल्टला बेस्ट स्विंग बॉल्स टाकायला सांग'.अलेक्सा म्हणाली 'बोल्ट सर्वोत्तम स्विंग बॉल टाकेल'. 'अलेक्सा पांड्याला आणि ईशान किशनला सर्वात लांब लांब सिक्सर मारायला सांग'.तेही अलेक्साने फॉलो केलं. 'अलेक्सा संघाचा 200 कर'.  200 झाला. 

मुंबई संघाच्या व्यवस्थापनाने आपल्या संघाला फर्मान केले'अलेक्सा बुमराहला सांग तुझे बेस्ट यॉर्कर्स टाक'.अलेक्सा म्हणाली' बुमराह बेस्ट यॉर्कर टाकेल'.मग सांगितले गेले'अलेक्सा ट्रेंट बोल्टला बेस्ट स्विंग बॉल्स टाकायला सांग'.अलेक्सा म्हणाली 'बोल्ट सर्वोत्तम स्विंग बॉल टाकेल'. 'अलेक्सा पांड्याला आणि ईशान किशनला सर्वात लांब लांब सिक्सर मारायला सांग'.तेही अलेक्साने फॉलो केलं. 'अलेक्सा संघाचा 200 कर'.  200 झाला. 

ऑस्ट्रेलियाचा एकेकाळचा कॅप्टन विक रिचर्डसन(इयन चॅपलचे आजोबा) चॅपलला कायम सांगायचे 'तुझा संघ कागदावर कितीही शक्तीशाली असो,क्रिकेट मध्ये ग्राउंडवर तुम्ही काय करता ह्यालाच फक्त महत्व असते.'
 

काल दिल्लीविरुद्ध मुंबईने कागद आणि ग्राउंड ह्यातिल अंतर संपवून टाकले. खरे तर कागदाचेच ग्राउंड केले. कागदावर नाव लिहिल्यावर त्या खेळाडूकडून जी अपेक्षा असते तशीच्या तशी कामगिरी ग्राउंड वर होणे आणि त्या सर्व कामगिरिंच्या समुच्ययाने सामना दिमाखदार पद्धतीने जिंकणे हे संघाला कल्पनेच्या पलीकडे सुखावणारे असते. म्हणूनच काल मुंबईचे खेळाडू विलक्षण आनंदी दिसत होते. अशा कामगिरीत काही दुरुस्ती सुचवता येत नाही. भाद्रपदातली संज्ञा अशावेळेस मदतीला येते.सर्वांगसुंदर.

अशा मोठ्या स्पर्धेच्या नॉक आऊट सामन्यात पहिली ओव्हर सामन्याचा टोन सेट करते.गोलंदाजाने पहिली ओव्हर अतिशय टाईट टाकून फलंदाजावर प्रसंगाचे दडपण आणायचे असते. डॅनियल सॅम्स ने डिकॉकला ह्या पहिल्या षटकात बर्थडे गिफ्ट्स दिल्या. प्रेशरच रिलीज झाले.(2003 च्या वर्ल्ड कप final ची आठवण झाली.झहीरचे पहिले षटक खराब गेले होते आणि सगळा मोमेंटम ऑस्ट्रेलिया कडे गेला होता.)मुंबईने आक्रमकता हेच सूत्र ठेऊन सामना खेळला.अशा वेळेस लय तोडण्याकरता कर्णधाराला आणि बॉलर्सला काही वेगळे डावपेच करावे लागतात.त्यात माईंड गेम्स पण असतात. ते कालच्या सामन्यात दिसले नाहीत.अश्विन ने 3 विकेट्स काढल्या पण दुसऱ्या बाजूने गोलंदाजीचा दर्जा कमी पडला.अर्थात मुंबईच्या फलंदाजांनी उन्मुक्त फलंदाजी केली हे त्यांचे क्रेडिट फार मोठे आहे.पंड्या आणि ईशान किशनच्या यशस्वी आक्रमणाने दिल्लीचे गोलंदाज पुरते सुन्न झाले.
गोलंदाजीत बुमराह आणि बोल्टच्या विकेट टेकिंग चेंडूनी कालच्या सामान्यातल्या दोन्ही

संघातल्या दर्जातला फरक तीक्ष्णपणे दाखवून दिला.
भारतातल्या प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये(रणजी ट्रॉफी  आणि इतर)मुंबई आणि दिल्ली ह्या दोन

संघातली खुन्नस भारतीय क्रिकेटला जिवंत ठेवण्यात,बहरवण्यात मोलाची कामगिरी करून गेलेली आहे.दोन्ही संघातले खेळाडू सामन्याच्या वेळेस एकमेकांकडे बघत सुद्धा नसत. अशा पार्श्वभूमीवर
दिल्लीच्या संघाचे(व्यावसायिक लीग मध्ये का होईना) नेतृत्व एक मुंबईकर करतोय(अय्यर), आणि तेही मुंबईच्या संघाविरुद्ध,मुंबईकर कर्णधारा विरुद्ध(रोहित) हे दृश्य मजेशीर होते.काळाचा महिमा. मुंबई संघाचा अंतिम सामन्यात दरारा जास्तं असेल हे नक्की.

      


संबंधित बातम्या

Saam TV Live