VIDEO | ...आणि पंतप्रधान मोदींना संसदेत कोसळलं रडू

साम टीव्ही
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021
  •  
  • काँग्रेस खासदार गुलाम नबी आझादांचा निरोप समारंभ 
  • निरोप देतांना पंतप्रधान मोदी झाले भावूक
  • आझादांच्या कार्याचा संसदेत गौरव 

काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांच्यासह चार खासदारांचा आज संसदेतला शेवटचा दिवस होता. यावेळी गुलाम नबी आझाद यांना निरोप देतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचं दिसून आलं. 

पाहा व्हिडिओ -

काँग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांच्यासह 4 खासदारांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपलाय. या सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. गुलाम नबी आझाद यांच्या कार्याचा पंतप्रधान मोदींनी गौरव केलाय. गुजरातच्या यात्रेकरूंवर काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ला झाला होता. त्यावेळी आपल्याला पहिला फोन गुलाम नबी आझाद यांनी केला. या घटनेबबद्दल आणि गुलाम नबी आझाद यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले होते. देशहिताला  गुलाम नबी आझाद यांनी नेहमी प्राधान्य दिलं असं गौरवौद्गारही मोदींनी यावेळी काढले.

गुलाम नबी आझाद यांना निरोप देतांना खासदारांनी त्याच्या कार्याचा गौरव केला. यानिमित्तानं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसच संजय राऊत यांनीही गुलाम नबी आझाद यांच्या आठवणींना उजाळा दिला. 
गुलाम नबी आझाद हे सर्वप्रथम 1980 आणि 1984 साली वाशिम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1990 पासून 2005पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते. पी.व्ही. नरसिंह राव आणि मनमोहनसिंग यांच्या राजवटीत केंद्रीय मंत्रिमंडळांत संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांनी काम सांभाळलं. त्यानंतर त्यांनी नागरी विमान वाहतूकमंत्री, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री तसच केंद्रीय आरोग्यमंत्री अशी पदं देखील सांभाळला. एक उत्तम संसदपटू आपल्यातून निवृत्त होतोय हीच भावना त्यांच्या निवृत्तीच्या निमित्तानं सभागृहात व्यक्त होत होती. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live