कोथळे खटल्यातील संशयिताचा मृत्यू, चार दिवसापूर्वी केले होते रुग्णालयात दाखल

विजय पाटील
बुधवार, 21 एप्रिल 2021

बहुचर्चित अनिकेत कोथळे खून  खटल्यातील संशयित बडतर्फ पोलीस  हवालदार अरुण टोणे  याचा हृदयविकाराच्या झटक्याने  मृत्यू झाला आहे. चार दिवसापूर्वी त्याची प्रकृती खालावल्याने कारागृह प्रशासनाने त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात  Hospital दाखल केले होते.

सांगली - बहुचर्चित अनिकेत कोथळे Aniket Kothale खून  Murder खटल्यातील संशयित बडतर्फ पोलीस  हवालदार अरुण टोणे Arun Tone याचा हृदयविकाराच्या झटक्याने  Heart Attack मृत्यू झाला आहे. चार दिवसापूर्वी त्याची प्रकृती खालावल्याने कारागृह प्रशासनाने त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात  Hospital दाखल केले होते. तिथे परिस्थिती बिघडल्यानंतर एका खसगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. Aniket Kothale suspect died at  hospital

सांगली Sangli शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत अनिकेत कोथळे याचा खून झाला होता. 6 नोव्हेंबर 2017 संशयावरुन अटक केलेल्या अनिकेत कोथळेवर पोलीसांनी तपासाच्या नावाखाली अमानुष थर्डडिग्रीचा वापर केला होता त्यात अनिकेतचा मृत्यू झाला. त्यानंतर संबधित संशयितांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अनिकेतचा मृतदेह आंबोली घाटातील निर्जनस्थळी जाळून टाकण्याचा प्रयत्न  करण्यात आला होता.

याप्रकरणी संशयित बडतर्फ पोलिस उपनिरिक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले आदींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. गेल्या काही दिवसांपूर्वी या खटल्याची जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणीसाठी संशयितांना न्यायालयात आणणे सोयीचे व्हावे, यासाठी सर्वांना सांगली मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान, चार दिवसापूर्वी टोणे याला त्रास जाणवू लागला. कारागृह प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. उपचारदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. डॉक्‍टरांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले.  Aniket Kothale suspect died at the hospital

Edited By- Shivani Tichkule

 

संबंधित बातम्या

Saam TV Live