परमबीर लेटरबाँब प्रकरणात अनिल देशमुख सीबीआय कार्यालयात हजर

साम टीव्ही ब्युरो
बुधवार, 14 एप्रिल 2021

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने समन्स बजावले आहे. त्यानुसार अनिल देशमुख हे १० च्या सुमारास डीआरडीओ गेस्ट हाऊस येथील सीबीआय कार्यालयात हजर झाले आहेत.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या Curroption आरोपप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने समन्स बजावले आहे. त्यानुसार अनिल देशमुख हे १० च्या सुमारास डीआरडीओ DRDO इमारतीतील सीबीआय कार्यालयात हजर झाले आहेत. Anil Deshmukh's inquiry begins in Parambir letter case

या प्रकरणात या पूर्वी पाच जणांची चौकशी झालेली आहे. त्यात देशमुख यांचे दोन स्वीय सहाय्यक, सचिन वाझे Sachin Vaze, दोन पोलिस अधिकारी, स्वत: आरोप करणारे परमबिर सिंह Parambir Singh यांची ही चौकशी झालेली आहे. १५ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने High Court दिले आहेत.

राज्य सरकारने State government मुंबई पोलिस आयुक्त पदावरुन हटविल्यानंतर परमबीरसिंग Parambir Singh यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांना पत्र लिहून महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी Anil Deshmukh सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला १००  कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप केला होता. अनिल देशमुखांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असा परमबीर सिंग यांचा दावा आहे. Anil Deshmukh's inquiry begins in Parambir letter bomb case

या प्रकरणात मुंबईच्या Mumbai अॅड. जयश्री पाटील Jayashree Patil यांनी उच्च न्यायालयात याचिका Petition दाखल केली होती. लाच Bribe मागण्याच्या संदर्भात अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याची पाटील यांनी या याचिकेद्वारे मागणी पाटील केली होती. त्यावर न्यायालयाने Court सीबीआयला CBI प्राथमिक चौकशीचा आदेश दिला.

Edited By - Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live