अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर


वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणीबाणीची घोषणा केली असून करोनाचा मुकाबला करण्यासाठी ५० अब्ज डॉलरची ( ५ हजार कोटी) तरतूद केली आहे. या आधी करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी स्पेननेही राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. चीनपाठोपाठ करोना व्हायरसने अमेरिकेतही हातपाय पसरल्याने अमेरिकन प्रशासन हादरून गेलं असून अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. 

 अमेरिकेत आतापर्यंत ११००हून अधिक लोकांना करोनाची लागण झाली असून ४० लोकांचा त्यामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे या व्हायरसचे अमेरिकेसारख्या विकसित आणि सुविधा संपन्न देशासमोरही आव्हान निर्माण झालं आहे,' असं ट्रम्प यांनी सांगितलं. तसेच अमेरिकेतील सर्व राज्यांना करोनाचा मुकाबला करण्यासाठी आपत्कालीन ऑपरेशन सेंटर तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये तातडीची पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. करोना व्हायरस रोखण्यासाठी वेळीच उपाय योजना केल्या नाहीत तर अमेरिकेतील १५ कोटी लोक या व्हायरसच्या कचाट्यात सापडू शकतात, अशी भीती ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे ट्रम्प यांनी हे मोठं पाऊल उचललं आहे. 'येणाऱ्या काळात देशवासियांना मोठी किंमत मोजावी लागेल. आता त्याग केला तर येणाऱ्या काळात त्याचा फायदाच होईल, असं सांगत येणारे आठ आठवडे संकटाचे असतील.


करोनामुळे जगभरात ११०हून अधिक देशांत आतापर्यंत १,३८००० लोकांना करोनाची लागण झाली असून ५,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या चीनमध्येच ३१८० लोकांचा करोनाने बळी घेतला आहे. तर इटलीत करोनामुळे १ हजार लोक दगावले आहेत. गेल्या ३६ तासांत ७ नव्या देशांमध्ये करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. समाधानाची बाब म्हणजे ५१.२ टक्के लोक करोनाच्या आजारातून बरे झाले आहेत.
 
आणीबाणीची घोषणा करतानाच हा व्हायरस रोखण्यासाठी रात्र न् दिवस काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं. आणीबाणी जाहीर केल्याने नॅशनल एमर्जन्सी अॅक्ट अंतर्गत आरोग्य विभागाचा अधिकाधिक बजेट हा आजार रोखण्यासाठी वापरता येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

WebTittle :: Announces National Emergency in America


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com