कोरोनामुळे आणखी एका पोलिसाचा मृत्यू

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 15 मे 2020

मुंबईत पोलीस दलात आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोरोनाचा धोका वाढत आहे. गुरुवारी 9 नवीन पोलीस कोरोना  पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या संख्येमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तर 55 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या पोलिसांना घरी राहण्याच्या सूचना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला आहेत. मुंबई पोलीस दलात आतापर्यंत जवळपास 600 च्या आसपास पोलीसांना कोरोनाची लागण झाली 

मुंबई :  राज्यातील मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या एकूण नऊ झाली आहे. राज्यातील १००१ पोलिसांना करोनाची लागण झाली असून तीन हजारांहून अधिक जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.मुंबई पोलिस दलातील आणखी एका पोलिसाचा गुरुवारी करोनामुळे मृत्यू झाला. शिवाजी नगर पोलिस ठाण्यातील ४५ वर्षीय भगवान पार्टे असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांच्या मृत्यूमुळे मुंबईतील करोनाबाधित मृत पोलिसांची संख्या सहावर पोहोचली आहे. 

पुणे, सोलापूर आणि नाशिकमध्ये प्रत्येकी एका पोलिसाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात करोनाबाधित पोलिसांची संख्या १००१ वर पोहोचली आहे. यामध्ये १०७ अधिकारी आणि ८९४ कर्मचारी यांचा समावेश आहे. ८५१ पोलिस अद्यापही उपचार घेत असून १४२ पोलिस बरे होऊन घरी परतले आहेत.

मुंबईत पोलीस दलात आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोरोनाचा धोका वाढत आहे. गुरुवारी 9 नवीन पोलीस कोरोना  पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या संख्येमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तर 55 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या पोलिसांना घरी राहण्याच्या सूचना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला आहेत. मुंबई पोलीस दलात आतापर्यंत जवळपास 600 च्या आसपास पोलीसांना कोरोनाची लागण झाली 

शिवाजी नगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पार्टे यांना पनवेल येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्यांची करोना चाचणी करण्यात आली. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना ७ मे रोजी नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुंबई पोलिस दलातील सहा जणांचा आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे.
 
WebTittle :: Another policeman killed by corona

संबंधित बातम्या

Saam TV Live