चीनमध्ये उसळणार संसर्गाची दुसरी लाट?

साम टीव्ही
सोमवार, 18 मे 2020
  • चीनमध्ये उसळणार संसर्गाची दुसरी लाट?
  • वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

जगभरातील देश हे कोरोनाची लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन करतायेत. तर चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गाचं संकट कायम असून देशामध्ये संसर्गाची दुसरी लाट येऊ शकते अशी भीती वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केलीय. काय आहे त्यामागचं कारण, पाहुयात एक रिपोर्ट

कोरोनानं साऱ्या जगासमोर मोठं आव्हान उभं केलंय. कोरोनाविरोधातल्या संघर्षात अनेक रूग्ण बरेही होत आहेत. मात्र ज्या चीनमधून कोरोनाच्या संसर्गाला सुरूवात झाली त्याच चीनमध्ये आता संसर्गाची दुसरी लाट येईल अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. चीनमध्ये आजही बहुतांश लोकांची रोगप्रतिकार शक्ती खूप कमी आहे. त्यामुळे ते पुन्हा संसर्गाला बळी पडू शकतात. असं तज्ज्ञांनी म्हंटलंय.  

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 82 हजार लोकांना या विषाणूंचा संसर्ग झाला असून 4 हजार 633 मृत्यू झाले आहेत. 
 तुर्तास चीनमधील सक्रीय रूग्णांची संख्या इतर देशांच्या तुलनेत खुपच कमी आहे. चीनमधील स्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली असून काही भागातील लॉकडाउन शिथिल करण्यात आल्यानंतर शाळा आणि कारखाने पूर्ववत सुरू झाले आहेत. उद्योगचक्र गतिमान झालंय मात्र तरीसुद्धा संसर्गाचा धोका कायम आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या अंदाजानुसार चीनमध्ये खरचं दुसरी लाट आली तर त्याचे परिणाम खुपच गंभीर असतील. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live