कोरोनाला रोखणारी अँटीबॉडी कॉकटेल थेरेपी? क्लिनिकल ट्रायल अंतिम टप्प्यात

साम टीव्ही
बुधवार, 8 जुलै 2020
  • कोरोनाला रोखणार अँटीबॉडी कॉकटेल थेरपी ?
  • क्लिनिकल ट्रायल अंतिम टप्प्यात
  • थेरपीसाठी अमेरिकेची 3367 कोटींची गुंतवणूक 

कोरोना रूग्णांना बरं करण्यासाठी आता एक नवी थेरपी आलीय. त्या थेरपीचं नाव आहे अँटीबॉडी कॉकटेल थेरपी...या थेरपीची चाचणी आता शेवटच्या टप्प्यात आहे. पाहुयात 

कोरोनावर लस शोधण्यासाठी साऱ्या जगभरात प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता अँटीबॉडी कॉकटेल थेरपीची प्रयोग अंतिम टप्प्यात आलाय. विशेष म्हणजे या थेरपीसाठी अमेरिकेनं तब्बल 3 हजार 367 कोटींचा करारही केलाय. 
जर्नल ऑफ क्लीनिकल वायरोलॉजीमध्ये या थेरेपीबाबत एक अहवाल प्रसिद्ध झालाय. त्यात आतापर्यंतच्या थेरपींमध्ये ही सर्वात उपयुक्त आणि प्रभावी थेरपी असल्याचं म्हंटलंय. 

या थेरपीला अँटीबॉटी कॉकटेल REGN-COV2 असं नाव देण्यात आलंय. या थेरपीनुसार अँटीबॉडीज कोरोनाच्या बाहेरील कोटेदार भागावर हल्ला चढवतील. त्यामुळे कोरोनाची शक्ती संपुष्टात येईल आणि संक्रमण थांबेल असा दावा करण्यात आलाय. 

सध्या ये थेरपीची  क्लिनीक्लन ट्रायल शेवटच्या ट्प्यात असून अमेरिकेतल्या 150 भागात जवळपास 2000 लोक या चाचणीत सहभागी होणार आहेत. अमेरिका, ब्राझील, मेक्सिको, चिली आदी ठिकाणी या थेरपीच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. ही चाचणी यशस्वी झाली तर वैद्यकीय जगतात ही एक मोठी क्रांती मानली जाईल. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live