अकोल्यात हवेतून ऑक्सिजन शोषून घेणाऱ्या प्लँटला बच्चू कडूंची मान्यता

जयेश गावंडे
गुरुवार, 15 एप्रिल 2021

ऑक्सिजनची कमतरता पडू नये यासाठी हवेतून ऑक्सीजन घेण्याबाबतचा प्लांट लवकरच सुरू करण्यात येणार असून या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

अकोला:  ऑक्सिजनची Oxygen कमतरता पडू नये यासाठी हवेतून ऑक्सीजन घेण्याबाबतचा प्लांट Oxygen Plant लवकरच सुरू करण्यात येणार असून या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. Bacchu Kadu Gives nod to Oxygen Absorbing Plant in Akola

हा राज्यातील नव्हे तर देशातील पहिला प्लांट असल्याचे मत राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू Bacchu kadu यांनी व्यक्त केले. राज्यमंत्री कडू म्हणाले सरकारला लॉक डाऊन Lockdown लावण्यात आनंद नसून लॉक लावणे दुर्दैवी आहे. त्यामुळे नागरिकांनी हा लॉक डाऊन आपल्यासाठी आहे समजून सहकार्य करावे आणि लॉक डाऊन यशस्वी करावा असे आवाहनही त्यांनी केले.  

दरम्यान अकोल्यात Akola कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून  जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन Oxygen ,रेडमीसिविर Ramdesivir इंजेक्शन तसेच बेड ची कमतरता पडणार नाही, याकडे सतत लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. तर ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठी हवेतून ऑक्सिजन कसा निर्मान करता येईल यासाठी  हवेतून ऑक्सीजन घेण्याबाबतचा प्लांट लवकरच सुरू करण्यात येणार असून या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हा राज्यातील नव्हे तर देशातील पहिला प्लांट असेल हा प्लांट सुरू होतोय याचा आनंद आहे मात्र ही वेळ यायला हवी नव्हती" असेही बच्चू कडू म्हणाले. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 50 खाटांचे आय सी यु युनिट तयार करण्याबाबत सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. Bacchu Kadu Gives nod to Oxygen Absorbing Plant in Akola

जिल्ह्यात कोणी उपाशी राहू नये यासाठी शासनामार्फत शिव भोजन थाली मोफत मिळणार आहे. अत्यंत गरीब व ज्यांना जेवणाची व्यवस्था नाही अशा गरजूंसाठी शिव भोजन थाली मोफत मिळणार आहे.  यासाठी गरजुंची नोंद करावी असे आवाहन त्यांनी केले. शिवभोजन थाली व प्राधान्य गटांना देण्यात येणारे मोफत अन्नधान्य याबाबत नियोजन करावे व याचा गैरवापर होणार नाही यासाठी  दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live