वेगवान लसीकरणासाठी परदेशातून लस खरेदीसाठी मान्यता द्या - राजेश टोपे

लक्ष्मण सोळुंके
सोमवार, 10 मे 2021

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली  राज्यात आम्ही जलदगतीने लसीकरणाला तयार आहोत मात्र केंद्राकडून लसी उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावला असून केंद्राने बाहेरच्या देशातून लस खरेदी करण्यासाठी राज्याला परवानगी आणि मान्यता द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

जालना : देशात कोरोनाचा Corona नवा स्ट्रेन दाखल  झाल्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून ही लाट थोपवण्यासाठी जलदगतीने लसीकरणाची Vaccination आवश्यकता आहे असा सल्ला WHO ने दिला आहे. Approve the purchase of vaccines from abroad for faster vaccination - Health Minister Tope demands

यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात आम्ही जलदगतीने लसीकरणाला तयार आहोत मात्र केंद्राकडून लसी उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावला असून केंद्राने Central Government बाहेरच्या देशातून लस खरेदी करण्यासाठी राज्याला परवानगी आणि मान्यता द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

 हे देखील पहा -

कोरोनातुन बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये म्यूकरमायकोसिसचं Mucormycosis प्रमाण वाढत चालल असुन यावरील औषधी महागड्या आहेत यावर बोलताना यावर आम्ही जनजागृती करणार असून या आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीनं उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करणार आहोत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून या आजाराचा उपचार मोफत करण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचे ते म्हणाले. या आजारावरील औषधांच्या किमती खाली आणण्यासाठी दोन दिवसांतच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं.Approve the purchase of vaccines from abroad for faster vaccination - Health Minister Tope demands

केंद्राने दिलेले व्हेंटिलेटर आणि सिलेंडरचा दर्जा चांगला असून ते पूर्णपणे वापरात आहे. मात्र काहींची दुरुस्ती करून त्यांचाही वापर करता येईल असंही त्यांनी सांगितले. सध्या कोविन Cowin अँप वरून संभ्रमाच वातावरण आहे. याच ऍपशी सुसंगत ऍप राज्याला बनवण्याची आणि हे केंद्राच्या ऍप जोडण्याची परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे केली आहे.

अवैध दारू विक्रीची अजब शक्कल; जमिनीत पुरून ठेवली दारू

यासाठी केंद्राने तातडीने परवानगी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. हे ऍप लसीकरणासाठी महत्वाचं ठरेल असंही टोपे म्हणाले. काल केंद्राने कोरोना संशयितांना देखील कोरोनाचे उपचार घेता येईल असा निंर्णय घेतला यावर राज्य सरकार या निर्णयाची अंमलबजावणी करेल आणि तशा प्रकारचा आदेश राज्य सरकारकडून काढण्यात येईल असं टोपे यांनी स्पष्ट केलं. Approve the purchase of vaccines from abroad for faster vaccination - Health Minister Tope demands

Edited By - Krushna Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live