शवदाहीनी अभावी कोरोनात मोफत ऑक्सीजन देणाऱ्या तब्बल 2 हजार झाडांची कत्तल!

beed
beed

बीड - कोरोना Corona महामारीत ऑक्सीजन Oxygen न मिळाल्याने रूग्णांचा श्‍वास कोंडत आहे. श्‍वास कोंडून माणसे मरण असताना, एका मृताच्या अंत्यसंस्कारासाठी Funeral 5 ते 6 क्विंटल लाकूड जाळले Burned जाते. विद्युत शवदाहीनी Electric crematorium नसल्याने कोरोना काळात व मोफत ऑक्सीजन देणाऱ्या तब्बल 2 हजार झाडाची कत्तल Tree Slaughter करून अंत्यसंस्कार केल्याचं वृक्ष मित्र सांगत आहेत. Approx Two Thousand Trees Cut Down Due To Lack of Electric Crematorium!

झाडे जगवण्यासाठी तालुकास्तरावर विद्युत शवदाहिनी उभा करा. अशी मागणी बीडमधील Beed वृक्ष प्रेमींनी केली आहे. वृक्षलागवडीवर Tree Planting करोडो रुपये खर्च करणाऱ्या बीड जिल्ह्यातील हे विदारक चित्र आहे. 

हे देखील पहा -

कोरोनाने राज्यभरात मृत झालेल्यांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न ऐरणीवर आलाय. तर एकाच चितेवर 8 मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचे अंबाजोगाईत Ambajogai समोर आले होते. यातच वृक्षतोड करुन अंत्यसंस्कारासाठी लागणारे सरपण गोळा केले जाते. विद्युत दाहिनी केली तर वृक्षतोड थांबवू शकते. यामुळे पर्यावरणप्रेमी कडून ही मागणी जोर धरू लागली आहे. Approx Two Thousand Trees Cut Down Due To Lack of Electric Crematorium!

बीड जिल्हयात 15 हुन अधिक मोठ्या सार्वजनिक स्मशानभूमी आहेत. प्रत्येक ठिकाणी रोज कमीत कमी 5 जणांवर अंत्यस्कार होतात. याची बेरीज केल्यास दिवसाला 375 क्विंटल तर महिन्याला 11 हजार 250 क्विंटल लाकूड लागते. हे मिळवण्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली जाते. असं बीड मधील वृक्ष मित्र बालाजी तोंडे यांनी सांगितले. 

ऑक्सीजन विना लोक मरत असताना मृतांना जाळण्यासाठी मोफत ऑक्सीजन देणारी झाडे तोडली जातात. हे सर्वात मोठे दुर्दैव असल्याचे सांगत ‘आम्ही वृक्ष मित्र’ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत प्रत्येक तालुक्यात विद्युत शवदाहीनी उभा करण्याची मागणी केली.  Approx Two Thousand Trees Cut Down Due To Lack of Electric Crematorium!

प्राणवायुच्या तुटवड्याने आणीबाणीपेक्षाही भयंकर परिस्थिती उद्भवली आहे. दिल्ली, मुंबई सारख्या शहरातच नव्हे तर वाड्या- वस्त्या आणि तांड्यावर राहणार्‍या लोकांचाही ऑक्सीजन विना श्‍वास कोंडू लागला आहे. वेळेत ऑक्सीजन न मिळाल्यामुळे शहरात आणि ग्रामीण भागातील खेडे गावात किड्या  मुंगीप्रमाणे माणसे मरत आहेत.

कोरोना महामारीत प्राणवायुचे महत्व अधोरेखीत होत असताना, प्रत्येक तालुक्यातील स्मशानभूमीत रोज काही टन लाकडे जाळून मयतांवर अंत्यसंस्कार केले जातात. यामुळे झाडांची होणारी कत्तल थांबून विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार केले जावेत. अशी मागणी वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी देखील केली आहे.

एका झाडापासून जास्तीत जास्त 5 क्विंटल वाळलेले लाकूड मिळते. असे गृहीत धरले तरी एकट्या बीड जिल्ह्यात केवळ अंत्यसस्काराच्या लाकडासाठी महिन्याला हजारांवर झाडे तोडली जातात. राज्यात 37 जिल्हे असून वर्षाकाठी अंत्यसंस्कारासाठी कमीत कमी 50 लाख क्विंटल लाकडू लागते. ऑक्सीजन विना माणसे मरत असताना ऑक्सीजनचा प्रमूख आणि नैसर्गीक स्त्रोत असलेली लाखो झाडे मयतांना जाळण्यासाठी तोडली जातात. Approx Two Thousand Trees Cut Down Due To Lack of Electric Crematorium!

हा सर्वात मोठा विरोधाभास असल्याची व्यथा वृक्ष मित्रांनी जिल्हाधिकारी यांच्यापुढे मांडली. यात लाकूड जाळल्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होते. जो कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतलेला असतो. तो 50 टक्के कार्बन-डाय ऑक्‍साईड वाळलेल्या झाडामध्ये असतो आणि तो जाळल्यानंतर उत्सर्जित होतो. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे देखील पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितले.

पर्यावरण प्रेमींनी दिलेल्या आकडेवारीनुसार :
1) महाराष्ट्रात कोरोनाने आजपर्यंत 75 हजार 859 लोकांचा बळी गेला.
2) दहा हजार लोकांचा दफनविधी झाला तर 65 हजार कोरोना मयतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल साडेतीन लाख क्विंटल लाकडे जाळण्यात आली. 
3) विद्युतदाहिनी असती तर लाखो झाडे वाचली असती. 
4) बीड जिल्ह्यात 2 टक्के वन क्षेत्र आहे. 
5) प्रत्येक वर्षी कोट्यावधी रुपयांचा खर्च सरकारकडून वृक्ष लागवडीवर करण्यात येतो. 

दरम्यान प्रत्येक वर्षी वृक्ष लागवडीच्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च करून वृक्ष लागवड केली जाते. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून देखील गावागावात वृक्ष लागवड केली जाते. यासाठी शासनाच्या तिजोरीतून जिल्ह्यात कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. Approx Two Thousand Trees Cut Down Due To Lack of Electric Crematorium!

मात्र हेच कोट्यावधी रुपये खर्च करून जगवलेल्या झाडांची आज अनेक भागात खुलेआम कत्तल केली जात आहेत. यामुळे निसर्ग निर्मित ऑक्सीजन प्लांट संपत चाललाय. हे थांबवायचे असेल तर बीड जिल्ह्यातीलच नाहीतर, राज्यातील प्रत्येक तालुक्यात विद्युत शवदाहिनी उभारण्यात यावी. अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 

Edited By : Krushna  Sathe 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com