आरारा खतरनाक! या सलूनमध्ये आग, सत्तूर आणि हतोड्यानं केली जाते हजामत

साम टीव्ही
शनिवार, 20 मार्च 2021

अली अब्बासचं जगावेगळं सलून
हातोडी, सत्तूरनं ग्राहकांची हजामत
ग्राहकांच्या केसाला लावली जाते आग

 

 

सलून व्यावसायिकांचं महत्वाचं औजार म्हणजे कैची  पण एक असा सलून व्यावसायिक आहे की जो सलूनमध्ये सत्तूर, हातोडा, फुटलेली काचेची बाटली वापरतो. कसा आहे हा सलून व्यावसायिक पाहा हा स्पेशल रिपोर्ट

दगडावर सत्तूर पाजवणारे अली अब्बास पाहा. तुम्हाला वाटलं असेल अली अब्बास यांचं मटणाचं दुकान असेल..पण असं नाही. अली अब्बास चक्क सलून चालवतात. अली अब्बास याचं जगावेगळं हातोडा सलून पाकिस्तानच्या लाहोरमध्ये आहे. या सलूनमध्ये सत्तूरनं केस कापले जातात. काही ग्राहकांच्या डोक्यावर सत्तूर आणि हतोडा चालवला जातो. तर काहींचे केस सत्तूरनं आकारात आणले जातात. काही ग्राहकांच्या डोक्याला चक्क आग लावली जाते. काही वेळा तर केस काचेच्या तुटलेल्या बाटलीनंही कापली जातात.

 पुरुष ग्राहकांसोबत महिला ग्राहकही अली अब्बास यांच्या सलूनमध्ये केस कापण्यासाठी गर्दी करतात.

 अली अब्बास यांच्या केस कापण्याच्या स्टाईलनं त्यांना जगावेगळं केलंय. कधी लाहोरला जायची संधी मिळाली तर स्वतःच्या डोक्यावर अली अब्बास यांच्याकडून कलाकारी करवून घ्यायला हरकत नाही.
 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live