आफ्रिकेला पळून जाणार होता अर्जुन रामपाल

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 30 मार्च 2021

NCB ने दिलेल्या माहितीनुसार ड्रग्स प्रकरणामुळे अर्जुन रामपाल हा परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता. असा धक्कादायक खुलासा  NCB च्या चार्जशीटमधून करण्यात आला आहे.

मुंबई: ड्रग्स प्रकरणामुळे अर्जुन रामपाल हा परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता. असा धक्कादायक खुलासा एनसीबी च्या चार्जशीटमधून करण्यात आला आहे. परदेशात जाण्याच्या तयारीत असणाऱ्या रामपालने साऊथ अफ्रिकेतील काऊन्सलेट जनरलसोबत पञव्यवहार देखील केला होता. (Arjun Rampal was preparing to flee abroad in a drug trafficking case)

सुशांतसिंग राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर बॉलीवूड (Bollywood) मधे अनेक गौप्य स्फोट होत आहेत. आत्महत्या (Suicide) प्रकरणाचा नेमका तपास घेण्यासाठी वेगवेगळ्या चौकश्या करण्यात येत आहेत. आणि त्यामधून बॉलीवूड मधील अनेक गोष्टी समोर येत आहेत.

अगदी नेपोटीजम (Nepotism) पासून ते ड्रग्स (Drugs) प्रकाणापर्यंत एक एक गुपितं समोर येत आहे. बॉलीवूड मधलं हे ड्रग्स प्रकरण फार गाजवलं गेलं. आणि या ड्रग्स प्रकरणामध्ये आपल्या अभिनेत्र्या (Actresses) सुद्धा मागे राहिल्या नाहीत. तपास सीबीआय कडे दिल्यानंतर  सीबीआयने केलेल्या चौकशी मधून त्या अभिनेत्रीचे ड्रग्स संबंध बाहेर येत होते. आणि याबद्दल अनेकांची नावे समोर येत राहिली. यानंतर एनसीबी (Narcotics Control Bureau) ने  ड्रग्स तस्करी (Drug trafficking) संबंधात बॉलीवूड मधील अनेक सेलिब्रिटी अडकले गेले. (Arjun Rampal was preparing to flee abroad in a drug trafficking case)

ड्रग्ज तस्करी प्रकरणात बॉलीवूड मधील अजून एक नवे नाव समोर येत आहे. ते म्हणजे बॉलीवूडचा गाजलेला अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal). (NCB) एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अर्जुन रामपाल एनसीबी च्या रडारवर आला होता. याची त्याला कुण कुण लागताच रामपाल परदेशात पळण्याच्या तयारीत होता याची माहिती NCB ला मिळाली. (Arjun Rampal was preparing to flee abroad in a drug trafficking case)

एनसीबीने साऊथ अफ्रिकेच्या काऊन्सलेटला पञ व्यवहार  करून याची कल्पना दिली. सुशांत राजपूत आत्महत्येनंतर ड्रग्ज प्रकरणात रामपालच्या घरातून काही नशेसाठी (Intoxication) वापरली जाणारी औषध NCB कडून जप्त करण्यात आली होती.  या प्रकरणी NCB ने रामपालला दोन वेळा चौकशीला बोलावले होते. चौकशीत दोन औषधे NCB ला मिळाली होती. त्यातील एक औषध हे कुञ्याचं होतं. ज्याच प्रिस्क्रिपशन लेटर मिळालं आहे.  तर दुसरी टॅबलेट ही त्याच्या बहिणीची असल्याचं म्हटलं जात आहे.

Edited By - Sanika Gade

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live