काश्मीरमध्ये चकमकीत पुण्यातील मेजर हुतात्मा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 जानेवारी 2019

पुणे : जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात पुण्यातील मेजर शशीधरन नायर हुतात्मा झाले आहेत. शशी नायर हे पुण्यातील खडकवासला येथे राहत होते. मेजर नायर यांचे पार्थिव सकाळी ११ वाजता विमानाने पुण्यात येणार असल्याची माहिती लष्करातर्फे मिळाली होती. 

राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागातील रूपमती आणि पुख्खरणी या ठिकाणी शुक्रवारी (ता. 11) संध्याकाळी नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडीच्या स्फोटात त्यांच्यासह अन्य एक जवान हुतात्मा झाला. या स्फोटांमध्ये सैन्यातील मेजर शशीधरन नायर हे हुतात्मा झाले आहे. 

हुतात्मा मेजर शशीधरन नायर हे पुण्यातील रहिवासी होते. त्यांच्या पत्नीचे नाव तृप्ती नायर असून, त्या पुण्यात खडकवासला येथे राहतात. मेजर शशीधरन हे ३३ वर्षांचे होते. ११ वर्षांपासून ते सैन्यात कार्यरत होते.

Web Title: An Army officer from pune killed in IED at explosions Rajouri district

संबंधित बातम्या

Saam TV Live