VIDEO | अर्णब गोस्वामी पोलिसांच्या ताब्यात, वाचा नेमकं काय आहे प्रकरण?

VIDEO  | अर्णब गोस्वामी पोलिसांच्या ताब्यात, वाचा नेमकं काय आहे प्रकरण?

201सालच्या अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिप8 ब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना, अलिबाग पोलिसांनी अटक केलीय. त्यांना आज दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. 

रायगडमधील अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या 2018मधील आत्महत्या प्रकरणात, अर्णब गोस्वामींवर कारवाई करण्यात आलीय.नाईक यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला होता.त्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नीने अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गेल्या काही महिन्यांपासून अर्णब गोस्वामी आणि मुंबई पोलिस यांच्यात खटके उडत होते. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार यांच्याविरोधात मोहिमच उघडली होती.

याआधीही मुंबई पोलिसांनी दोन वेळा अर्णब यांची चौकशी केली होती. त्यानंतर टीआरपी प्रकरणावरूनही रिपब्लिक टीव्हीवर गंभीर आरोप झाले.

पाहा व्हिडीओ-

वाचा अन्वय नाईक प्रकरण नेमकं काय आहे?

इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज महाराष्ट्र सीआयडीने त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. पोलिसांनी आपल्याला व आपल्या सासू-सासऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे. पोलिस अर्णब यांना घेऊन अलिबागकडे रवाना झाले आहेत. 

आज सकाळीच सुमारे डझनभर पोलिस अर्णब यांच्या निवासस्थानी गेले. तेथून त्यांना अक्षरशः उचलून पोलिस व्हॅनमध्ये कोंबण्यात आल्याचा आरोप रिपब्लिक टिव्हीने केला आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे

२०१८ मध्ये इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातुश्री कुमुद नाईक अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. त्यावेळी पोलिसांना अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. या वर्षीच्या मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीआयडी चौकशीचा आदेश दिला होता. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com