VIDEO | कोरोनाच्या संकटातही पाकिस्तानची खुमखुमी, आरोग्य सेतू ऍप केलं हॅक

अमोल कविटकर
शनिवार, 2 मे 2020
  • आरोग्य सेतू अॅपवर पाकिस्तानची चोरटी नजर
  • भारतीय लष्कराची माहिती चोरण्याचा पाकिस्तानचा डाव
  • कोरोनाच्या संकटातही पाकिस्तानची खुमखुमी

कोरोनाच्या युद्धात भारतासह जग लढत असताना पाकिस्तान मात्र कपट कारस्थानात रमलाय. काय केलंय पाकिस्ताननं भारताविरोधात... पाहा...

कोरोनाच्या संकटात सगळ्या जगाचं लक्ष लोकांचे जीव वाचवण्यावर असताना पाकिस्तानच्या कुरापती मात्र सुरूच आहेत. म्हणूनच भारतीय गुप्तचर यंत्रणांनी सावधानतेचा इशारा दिलाय. कारण पाकिस्तानची नजर यावेळी पडलीय ती आरोग्य सेतू अॅपवर. भारतातील कोरोनाची आवश्यक माहिती मिळावी म्हणून सरकारने हे अॅप विकसित केलंय. मात्र तसंच बनावट अॅप पाकिस्तानकडून तयार करण्याच्या हालचाली सुरूयत. असं बनावट अॅप बनवून भारतीय लष्कराची महत्त्वाची माहिती चोरण्याचं कारस्थान पाकिस्तान रचत असल्याचं समजतंय.

पाकिस्ताननं जे कपट रचलंय त्यातून भारताच्या सुरक्षेची गोपनीय माहिती चोरी होऊ शकतेच, पण देशातील नागरिकांच्याही खासगी माहितीवर त्यामुळे घाला येऊ शकतो. भारताविरोधात कायमच कुरापती करणाऱ्या पाकिस्तानचे नापाक धंदे कोरोनाच्या संकटातही थांबेनात. पाकिस्तानमध्येही कोरोनानं थैमान घातलंय. पाकिस्तान सरकारचं कोरोनामुळे कंबरडं मोडून गेलंय. त्यामुळे सुंभ जळला तरी पीळ कायम ठेवणाऱ्या पाकिस्तानची खोड पुरती जिरवायलाच हवी.


संबंधित बातम्या

Saam TV Live