चक्क रुग्णवाहिकेतुन दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले जेरबंद.....

गोविंद साळुंखे
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

लॉकडाऊन कालावधीत पोलीस बंदोबस्तात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह पोलिसांनी पकडले आहे व त्यांना अटक केले आहे

शिर्डी : लॉकडाऊन Lockdown कालावधीत पोलीस Police बंदोबस्तात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन अवैधरित्या दारूची Alcohol विक्री करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह पोलिसांनी पकडले आहे व त्यांना अटक Arrested केले आहे. कोरोना काळात अनेक जण समाजसेवा करुन समाजाबांधवा पुढे एक आदर्श निर्माण करत आहेत.

मात्र काही महाभाग त्याचा गैरफायदा घेत आहेत. अहमदनगरच्या संगमनेर Sangamner शहरात रुग्णवाहिकेमधून अक्षरशः देशी दारूची वाहतूक केली जात आहे. शहर पोलिसांनी हा प्रकार करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. संगमनेर शहर पोलीस शहरात नाकाबंदी दरम्यान, रुग्णवाहिकेत ambulance रुग्ण नसताना, देखील रुग्णवाहिका सायरन वाजवत आली. Arrested for transporting liquor in ambulance

पोलिसांनी सायरन का वाजवतो अशी विचारणा केली असता, रुग्णवाहिका चालकाची भंबेरी उडाली. त्यानंतर रुग्णवाहिकेची झडती केली असता. त्यामध्ये देशी दारूचे ७ बॉक्स आढळून आले आहे. संगमनेर शहर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून २ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live