उजनी जलाशयात फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन 

flamingo bird
flamingo bird

बारामती :  उजनीच्या Ujani पाणलोट क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी Birds वास्तव्यास येत असतात. परंतु मुख्य आकर्षण असते ते फ्लेमिंगोचे flamingo . फ्लेमिंगो पाहण्यासाठी वेगवेगळ्या भागातून पर्यटक Tourists उजनीच्या पाणलोट क्षेत्रात येत असतात. दरवर्षी फ्लेमिंगो ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये येत असतात परंतु ते यावर्षी मार्चमध्ये आलेत. Arrival of flamingo birds in Ujani Reservoir

सध्या उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील कुंभारगाव येथे सूर्योदय आणि सुर्यास्तावेळी पक्षांचा मोठा अजाण ऐकू येतो हा आवाज फ्लेमिंगोचा पक्षयांचा असतो. हजारो किलोमीटरचा प्रवास करून फ्लेमिंगो उजनीच्या पाणलोट क्षेत्रात येतात. यंदा मात्र हे पक्षी उशिरा आणि दरवर्षी पेक्षा कमी संख्येने आले आहे.

उजनीच्या पाणलोट क्षेत्रात नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वास्तव्यास असतात. परंतु पर्यटकांना  मुख्य आकर्षण असते ते फ्लेमिंगोचे. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक फ्लेमिंगो पाहण्यासाठी येत असतात. परंतु गेल्या वर्षी पाऊस जास्त झाला. त्यामुळे यंदा फ्लेमिंगोची संख्या कमी झाली.त्यांना यायला देखील उशीर झाला.वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन पडलं आणि पर्यटकांवर निर्बंध आले. Arrival of flamingo birds in Ujani Reservoir

फ्लेमिंगो आले की दररोज उजनीच्या काठावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. यंदा मात्र दरवर्षीच्या तुलनेत फ्लेमिंगो कमी आणि उशिरा आल्याने पर्यटकांचा हिरमोड झालाय. 

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com