तेरी मेरी यारी 60 वर्षांनंतरही लय भारी

अशोक गव्हाणे
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

 

माजी राज्यपाल असल्याने राहिलेलं आयुष्य सहज काढता आलं असतं. पण, नाही केवळ आणि केवळ आपल्या 80 वर्षाच्या मित्राच्या शब्दासाठी ही निवडणूक लढायची आहे. 80 व्या वर्षापर्यंतच काय पण अजून 80 वर्षे जरी जगलो तरी ही मैत्रीची मिसाल जगाला द्यायची आहे. 80 व्या वर्षी श्रीनिवास पाटलांनी शरद पवार यांच्या मैत्रीखातर सातारा लोकसभेची निवडणूक लढविली होती याची इतिहास नक्की नोंद घेईल.

 

माजी राज्यपाल असल्याने राहिलेलं आयुष्य सहज काढता आलं असतं. पण, नाही केवळ आणि केवळ आपल्या 80 वर्षाच्या मित्राच्या शब्दासाठी ही निवडणूक लढायची आहे. 80 व्या वर्षापर्यंतच काय पण अजून 80 वर्षे जरी जगलो तरी ही मैत्रीची मिसाल जगाला द्यायची आहे. 80 व्या वर्षी श्रीनिवास पाटलांनी शरद पवार यांच्या मैत्रीखातर सातारा लोकसभेची निवडणूक लढविली होती याची इतिहास नक्की नोंद घेईल.

सोशल मीडियावर फक्त शरद पवार यांचीच चर्चा चालू आहे मात्र, या काळात मला एक वेगळाच माणूस भावून गेला तो म्हणजे साताऱ्याचे लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार माननीय श्रीनिवास पाटील.

उदयनराजे म्हणतात, मी अजून संपलो नाही!

दोनवेळा लोकसभेचे माजी खासदार, संसदेत विविध समित्यांवर काम, जवळपास 35 वर्षे भारतीय प्रशासकीय सेवेत काम आणि त्यानंतर काही दिवस सिक्कीमचे राज्यपाल. आणखी काय हवंय वय वर्ष 80 असताना आयुष्यात? परंतु, आपल्या मित्राला सर्वच जण सोडून जात असताना साताऱ्याचे विद्यमान खासदारही विरोधी पक्षात सामील झाले आहेत. एका माजी मुख्यमंत्र्यांना लोकसभा लढण्याची विनंती होते. पण, हारण्याच्या भीतीने कोणी लढायला तयार होत नव्हतं. अशात श्रीनिवास पाटील हे नाव पुढे येतं आणि हा माणूस एका पायावर तयार होतो.

हे सर्व कशासाठी?, थोडा वेळ बोलायला उभं राहिलं तर हातपाय लटपटत असताना कशाला हवीय निवडणूक? माजी राज्यपाल असल्याने राहिलेलं आयुष्य सहज काढता आलं असतं. पण, नाही केवळ आणि केवळ आपल्या 80 वर्षाच्या मित्राच्या शब्दासाठी ही निवडणूक लढायची आहे. 80 व्या वर्षापर्यंतच काय पण अजून 80 वर्षे जरी जगलो तरी ही मैत्रीची मिसाल जगाला द्यायची आहे. 80 व्या वर्षी श्रीनिवास पाटलांनी शरद पवार यांच्या मैत्रीखातर सातारा लोकसभेची निवडणूक लढविली होती याची इतिहास नक्की नोंद घेईल.

पवारांनी पाऊस चालू झाल्यावर छत्री नाकारली आणि भाषण चालू केले त्यानंतर काळजीखातर अचानक श्रीनिवास पाटील पवारांच्या जवळ येऊन थांबले. पवारसाहेब पावसात बोलत होते. सगळ्यांच्या नजरा शरद पवार यांच्यावर होत्या पण श्रीनिवास पाटील यांची ही कृती अधोरेखित करण्यासारखी होती. कारण, संकटातही मित्राच्या खांद्याला खांदा लावून उभा होता हा माणूस. याला म्हणायचं मित्र प्रेम. ही राजकारणा पलीकडची मैत्री आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हे जपायला हवं, हे वाढवायला हवं, आपल्यावर प्रेम करणारी माणसं आपल्याला तयार करता यायला हवीत.

60 वर्षाची मैत्री आहे, एखाद्याचं आयुष्य पण नसतं तेवढं. आयुष्यात काय मिळो न मिळो श्रीनिवास पाटलांसारखा मित्र जरूर मिळावायला हवा.

आयुष्यात कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगतां कणखरपणे साथ देणारा श्रीनिवास पाटील साहेबांसारखा सच्चा मित्र हवाच.


संबंधित बातम्या

Saam TV Live