तमाशातले खलनायक दत्ता नेटके पेठकर यांचे निधन... 

Datta Netke Petkar
Datta Netke Petkar

पुणे :तमाशाची लोककला गावागावांत पोहचविणारे व्यक्तीमत्व आणि यात्रा-जत्रांमधून मनोरंजनाच्या माध्यमातून खलनायक अशी ओळख मिळवणारे एक तमाशा कलावंत खलनायक दत्ता नेटके पेठकर यांचे वयाच्या 52 व्या वर्षीच आज पुणे जिल्ह्यतील आंबेगाव तालुक्यातील पेठ येथे कोरोनाने निधन झाले. Tamasha  Artist villain Datta Netke Pethkar passes away

कोरोना Corona महामारीचं संकटाचा परिणाम सर्वच क्षेत्रातील नागरिकांना बसत आहे. या महामारीत Corona Pandemic लहानांपासून थोरांपर्यत राजकीय,सामाजिक,उद्योजकांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. पेठकर यांनी महाराष्ट्राची लोककला गावागावांत तमाशाच्या रुपातून, तमाशात वगनाट्यतील खलनायकाच्या भूमिका सादर करत पोहोचवली

पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य मंडळ, रघुवीर खेडकर लोकनाट्य मंडळ, मालती इनामदार लोकनाट्य मंडळ, भीका-भीमा सांगवीकर लोकनाट्य मंडळ यासारख्या मोठ्या तमाशा फडात त्यांनी अनेक वर्षे काम केले.  अनेक वर्ष काम केलं आहे. 

तमाशाची लोककला रसिक चाहत्यांच्या मनावर अधिराज्य निर्माण करणारा युवा खलनायक व तडफदार भूमिका सादर करणारा कलाकार म्हणून त्यांची ख्याती होती. तमाशा क्षेत्रात प्रत्येक फडात आपले स्वतःचे अस्तित्व ठेवून त्यांचे वर्तन होते. याशिवाय कधी हलगी वादक, तर कधी सरदार असं स्मरणात राहणारं काम त्यांनी केले आहे. वयाच्या पंधराव्या वर्षी  तमाशा क्षेत्रामध्ये त्यांनी प्रवेश केला. यांनी तमाशा क्षेत्रामध्ये प्रवेश केला तो इयत्ता आठवी पास झाल्यानंतरच.. तमाशा कलेची त्यांना आवड होती, परंतु घराण्याला तमाशा क्षेत्राचा कुठलाही वारसा नव्हता. तमाशा क्षेत्रातल्या वगनाट्यातील भूमिकांना न्याय देण्याचं काम पंचवीस-तीस वर्ष केले आहे. 

नेटके यांच्या मागे पत्नी व एक मुलगा आहे.कोरोनाने त्यांच्यावर घाला घातला आणि तरुण तडफदार खलनायकाला महाराष्ट्रातला रसिक आज पोरका झाला.अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील संस्था नारायणगाव,राष्ट्रीय बहुजन विकास महासंघ महाराष्ट्र राज्य,जुन्नर आंबेगाव खेड मुळशी मातंग स्पीक या सर्वांच्या वतीने नेटके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

Edited By- Digambar jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com