परभणी पोलिस दलातले 'संजय राऊत' करताहेत सहकाऱ्यांचे मनोरंजन!

Parbhani Police Entertaining colleagues through their art skills
Parbhani Police Entertaining colleagues through their art skills

परभणी : एकदा घराबाहेर पडल्यानंतर कधी सुटी मिळेल यांची शाश्वती नसणाऱ्या पोलिस Police कर्मचाऱ्यांकडून स्वतःचा विरंगुळा व्हावा यासाठी छंद वेगवेगळं छंद जोपासले जात आहेत. या माध्यमातून ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न काही पोलिस कर्मचारी करीत आहेत. यातले एक पोलिस कर्मचारी रमाकांत भदर्गे तर दिसण्यातील साम्यामुळे परभणीतले 'संजय राऊत' Sanjay Raut म्हणून ओळखले जात आहेत. ते नृत्यात निपूण आहेत.  Artists in Parbhani Police Entertaining Colleagues in Corona Times

परभणी Parbhani पोलिस दलात एक हजार सातशे नव्व्याण्णव कर्मचारी कार्यरत आहेत. मागील एक वर्षापासून कोरोनामुळे Corona कर्मचाऱ्यांना ड्यूटीच्या वेळेचे बंधन राहिले नाही. कोणत्याही वेळी ड्युटीवर बोलविले जाते. मात्र ड्यूटीचा कालावधी पूर्ण झाल्यावरही घरी जाता येईल का नाही यांची शाश्वती नसते. त्यामुळे नोकरीतला ताणतणाव कमी करण्यसाठी आपल्यातील सुप्त कला गुणाना काही पोलिस कर्मचाऱ्यांनी वाव दिला आहे. यातून स्वत: सह आपल्या कुटुंबीयांचे आणि सहकाऱ्याचे मनोरंजन केले जाते.

हे देखिल पहा - 

सहज म्हणून केलेले नृत्य Dance सोशल मीडियावर व्हायरल झाले यातून राज्यभरात वेगळीच ओळख निर्माण झाली. नृत्य करण्याचा छंद सुरुवातीपासून होता. मात्र ह्या नृत्यामुळे खासदार संजय राऊत यांच्या नावाने मी परभणीतील संजय राऊत म्हणून ओळखला जाऊ लागलो, असे रमाकांत भदर्गे यांनी सांगितले. 

रणजित आगळे यांनी  कोरोना काळात आपला गायनाचा Singing छंद जोपासला असून कुटुंबासह सहकाऱ्यांचे मनोरंजन करतात.पोलिस दलात नित्याचे काम करत असतानाच डान्स करणे, गायन असे अनेक छंद पोलिस कर्मचारी कर्मचारी जोपासतात त्यांना त्यांच्या कुटुंबीयासह सहकाऱ्यां कडूनही दाद मिळते. विठ्ठल कटारेही चांगले गायक आहेत. तेही आपली कला सादर करुन कुटुंबिय -सहकाऱ्यांचे मनोरंजन करुन दाद मिळवतात.संतोष व्यवहारे हे  बासरी वादन किंवा माऊथ ऑर्गन वाजवत आपली कला जोपासतात. Artists in Parbhani Police Entertaining Colleagues in Corona Times

गेल्या वर्षभरा पासून पोलिसांवर मोठा ताण असून अशा पोलिस कर्मचाऱ्यांच्या कलागुणांमुळे कुटुंबीयासह दलातील ताण कमी होण्यास मदत मिळत आहे. या कोरोना काळात या कर्मचाऱ्यांमधले कलागुण गुण अधिकच फुलत आहेत. त्यामुळे त्यांचाही मानसिक ताण कमी होतो आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com